
पुणे! मोशी येथील सोनाली मृत्यू प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील दुर्दैवी अपघातात नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. मृत नागेश यांच्या पत्नी सोनाली गायकवाड (वय २८) यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली गायकवाड आत्महत्या प्रकरणात आता नव वळण येण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मोशीतील कचरा डेपो दुर्घटनेत पतीला गमावल्याने सोनालीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यातून तिने टोकाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, सोनाली गायकवाड हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत भोसरी एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.
View this post on Instagram
पतीच्या निधनानंतर सोनाली या सासरच्या त्रासाला सामोऱ्या जात होत्या. पतीच्या मृत्यूनंतर प्रशासनाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीवरून सासरच्या लोकांनी त्यांच्याशी वारंवार वाद घातले. तसेच पतीच्या पश्चात त्यांना सातत्याने टोमणे मारले जात होते. याशिवाय सोनाली यांना दोन्ही मुलीच झाल्याने सासरच्या मंडळींकडून त्यांचा प्रचंड मानसिक छळ केला जात होता, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर सोनाली यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी सोनाली यांच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मोशी कचरा दुर्घटनेतील पीडित कुटुंबातील या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात प्रचंड हळहळ आणि संताप व्यक्त केला जात असून, दोन चिमुकल्या मुलींचे छत्र हरपले आहे.
हृदयद्रावक! मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यूनंतर पत्नीनेही संपवलं जीवन, चिमुकल्या झाल्या पोरक्या…
हृदयद्रावक! पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन्…
हृदयद्रावक! पुणे शहरात आईच्या मृत्यूनंतर मुलाने घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…
हृदयद्रावक! पुण्यात नोकरी मिळाली पण शाम्पूच्या पुड्यांनी घात केला; तिघींचा मृत्यू…

