
स्वातंत्र्यदिनाच्या भीषण अपघातात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू…
वर्धा : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला पाठी मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तीन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) 15 ऑगस्ट रोजी तिन्ही विद्यार्थिनी दुचाकीवरून जात होत्या. याचवेळी आंबेडकर शाळेजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रॅव्हल्सने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मुलींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिन्ही मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram
समृद्धी रुपक धामसे (वय 15, संत गोमाजी वॉर्ड, हिंगणघाट), आरुही राजू चवरे (वय 17) आणि मिसबा जावेद शेख (वय 17, संत चोखोबा वॉर्ड) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शाळकरी मुलींचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिन्ही मुलींच्या मृत्यूची बातमी समोर येताच हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक! नवविवाहित दाम्पत्याचा अंत्यविधीसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात चार जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये…
हृदयद्रावक! माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू…
हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…
भीषण अपघात! सातारच्या आठ मित्रांची हर्णे बीचची ट्रीप ठरली अखेरची; पाहा मृतांची नावे…

