चिमुकल्याला उंदरांनी कुरतडलं; 50 पेक्षा जास्त वेळा चावा…

न्यूयॉर्क : एका 6 महिन्यांचे बाळ पाळण्यात झोपले असताना उंदरांनी त्याच्यावर हल्ला केला. उंदरांनी चिमुकल्याचा तब्बल 50 पेक्षा जास्त वेळा चावा घेवून शरीर कुरतडले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळ रक्ताच्या थारोळ्यात दिसल्याने पालकांना ही घटना कळली.

मुलाचे आई-वडील डेव्हिड आणि एंजल शोनाबाम आपल्या मुलाला पाहायला गेल्यानंतर त्यांना बाळाला पाहून धक्का बसला. बाळ रक्तबंबाळ झाले होते. शिवाय, च्या शरीरातून रक्तस्त्राव होत होते. त्यानंतर बाळा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या अहवालानुसार, मुलाचा गाल, नाक, कपाळ, पाय, हात, मांड्या, हात आणि पायाची बोटे यावर उंदीर चावल्याच्या अनेक खुणा आहेत. यामधून खूप रक्तस्त्राव झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, उंदरांनी मुलाचा उजवा हात कोपरापर्यंत कुरतडला होता. त्याच्या बोटांच्या काही भागालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे हाडे बाहेर आली होती. या घटनेनंतर मुलाला ताबडतोब इंडियाना पोलिस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाची योग्य काळजी न घेतल्यामुळे आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेतील आरोपींमध्ये आई-वडिलांशिवाय मुलाची मावशी डेलानिया थुरमन हिचेही नाव आहे. पोलिसांनी डेलानियालाही अटक केली आहे, जी त्याच घरात राहायची.

पोलिसांनी सांगितले की, बाळाला तीन आणि सहा वर्षांचे भाऊ-बहीण आहेत. घरात अस्वच्छता असून, संपूर्ण घर कचरा आणि उंदरांनी भरलेले होते. मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, मार्चपासून उंदरांचा हा त्रास सुरू झाला. घरातील मुलाला उंदीर चावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी घरातील आणखी दोन मुलांना झोपेत उंदरांनी चावा घेतला होता.

सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू…

मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…

माता तू न वैरिणी! चिमुकलीला 14व्या मजल्यावरून फेकलं…

संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!