पुणे शहरात खूनसत्र थांबेना; युवकाची मध्यरात्री हत्या…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणानतंर पुण्यात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. हडपसरमध्ये एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या झाली होती. तर गुलटेकडी परिसरात मध्यरात्री युवकाची हत्या करण्यात आली आहे. मोक्का अंतर्गत अटक झालेल्या आणि जामिनावर सुटलेल्या आरोपींनी ही हत्या केलीय. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे शहारतील गुलटेकडी परिसरात युवकाची हत्या करण्यात आली आहे. सुनील सरोदे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सुनील सरोदे याची हत्या रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे या दोघांनी केली. दोघेही मोक्यातील आरोपी असून ते जामिनावर बाहेर होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, हडपसरमध्ये मोबाईलचा हॅाटस्पॅाट न दिल्यान चार आरोपींनी वासुदेव कुलकर्णी यांचा खून केला होता. आरोपींना एनर्जी ड्रींक खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांना ॲानलाईन पेमेंट करायचे होते. ॲानलाईन पेमेंट करण्यासाठी आरोपींनी वासुदेव कुलकर्णी यांना हॅाटस्पॅाट मागितला. कुलकर्णी यांना हॅाटस्पॅाट देण्यास नकार दिल्याने वाद झाला. त्यात आरोपींनी कुलकर्णी यांच्यावर धारधार शस्रांनी वार केला. त्यात कुलकर्णी यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तीन आरोपी अल्पवयीन आहेत.

नानापेठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी (ता. १) हत्या झाली. या प्रकरणी वनराज यांच्या सख्ख्या बहिणीसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्या टोळीतील १५ जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यात डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू…

पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

पुणे शहरात गुंडाची हत्या; टोळक्याने पाठलाग करून ठेचलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!