
पुणे! बॅगेतील 15 लाख रूपयांसाठी 4 सशस्त्र भर रस्त्यात भिडला चोरट्यांशी अन्…
पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका युवकाने दाखवलेल्या धाडसामुळे तब्बल १५ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. शस्त्राचा धाक दाखवून पैसे हिसकावणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना युवकाने भर रस्त्यात अक्षरशः धूळ चारली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी युवक हा एका खाजगी कार्यालयात कामाला आहे. कार्यालयीन कामासाठी त्याने बँकेतून १५ लाख रुपयांची रोकड काढली होती. ही रक्कम पिशवीत भरून तो आपल्या दुचाकीवरून कार्यालयाकडे निघाला होता. वडगाव शेरी येथील ऑक्सिजन पार्कजवळ तो पोहोचला असता, दोन दुचाकींवरून आलेल्या चार चोरट्यांनी त्याला घेरले. चोरट्यांनी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवला आणि पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या परिस्थितीत न डगमगता युवकाने प्रसंगावधान राखले आणि एका चोरट्याला जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे दुचाकीवरील दोन चोरटे भररस्त्यात कोसळले. युवकाने जोरजोरात आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकही तात्काळ मदतीला धावून आले.

नागरिकांचा जमाव येत असल्याचे पाहून चोरटे घाबरले. १५ लाखांच्या रोकडीला हात न लावता ते आपली मोटारसायकल घेऊन तिथून पसार झाले. युवकाच्या या धाडसी कृत्यामुळे १५ लाखांची मोठी रक्कम वाचली आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
पुणे! वृद्धाला ‘व्हर्च्युअल कोर्टरूम’मध्ये डिजिटल अरेस्ट करणारे दोघे ताब्यात…
पुणे पोलिसांनी 9 अट्टल गुंडांना केलं तडीपार; पाहा नावे…
पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; ‘सदैव एकनिष्ठ’ स्टेटस ठेवणारा गजाआड…
पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…

