अहमदनगर हादरलं! प्रियकरासाठी आईनेच काढला पोटच्या दोन मुलांचा काटा…

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. मात्र, हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद देखील केली. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याचा संशय गावकऱ्यांना आला होता. दोन महिन्यानंतर या दोन संख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर, घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. धक्कदायक बाब म्हणजे आपल्या प्रेमात अडथळा असणाऱ्या मुलांना जनमदात्या आईने आणि तिच्या प्रियकरानेच शेततळ्यात ढकलून संपविल्याचे एका साक्षीदाराच्या साक्षीने उघड झाले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, 17 एप्रिल 2024 रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (वय 12) आणि प्रणव सारंगधर पावसे (वय 8) या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. वर्षभर अगोदरच मुलांच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत होती आणि मुलांचा देखील शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनेकदा व्यक्त केला. मात्र, पुरावे नसल्याने पोलिस तपासात यश आले नाही.

एका साक्षीदाराने तब्बल दोन महिन्यानंतर दिलेल्या जबाबावरून हा अपघात नव्हे तर खून असल्याचे समोर आले आहे. दोन्ही मुलांचा घातपात जन्मदाती आई कविता सारंगधर पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे यांनी केला असल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सचिन बाबाजी गाडे आणि मयत मुलांची आई कविता या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! पतीला फोन करून मुलीचं शेवटचं तोंड पाहा म्हणाली अन्…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात चार मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…

प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…

अहमदनगर जिल्हा हादरला! मांजरीमुळे एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले…

अहमदनगर हादरलं! दारुड्याने संशयावरून पेटवले घर, तिघींचा होरपळून मृत्यू…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!