पुणे! पाकिस्तानला पाठिंबा देणारी विद्यार्थिनी अटकेत; कोर्टात ‘डुप्लिकेट’ ड्रामामुळे खळबळ…

पुणे: काश्मीरमधून शिक्षणासाठी पुण्यात आलेली अभियांत्रिकीची विद्यार्थिनीने (वय १९) सोशल मीडियावर युद्धजन्य वातावरणात केलेली वादग्रस्त ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी पोस्ट केल्याने अडचणीत आली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी तिला अटक केली. तिच्या अटकेनंतर शहरात काही संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती.

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईला देशातील नागरिकांनी पाठिंबा दिला. सोशल मीडियावरही याचे प्रतिबिंब उमटत होते. मात्र, पुण्यातील एका काश्मिरी विद्यार्थीनीने सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थात पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी तिला अटक केली.

पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी विद्यार्थीनीला शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र तिच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी अनोखी युक्ती वापरली. हुबेहुब तिच्यासारखा पेहराव केलेली महिला पोलिस कर्मचारी तिच्यासोबत न्यायालयात हजर करण्यात आली. दोघींना पाहून क्षणभर संभ्रम निर्माण झाला. न्यायालयाने विचारणा केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने स्वतः पोलिस असल्याचे स्पष्ट केले.

www.puneganpati.com

पुणे! युवतीने इन्स्टाग्रामवर लिहीले ‘पाकिस्तान झिंदाबाद’; पोलिसांनी केली अटक…

Ind vs Pak : पाकच्या गोळीबारात हवाई दलाच्या जवानासह बीएसएफचा अधिकारी हुतात्मा…

जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…

Video: भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा…

India vs Pakistan: BCCIने तडकाफडकी IPLचे सामने अनिश्चित काळासाठी थांबवले…

पाकिस्तानची कोंडी! भारताच्या कारवाईनंतर बलुचिस्तानने सु्द्धा घेतले हात धुवून…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!