पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्यांची नावे आली समोर…

पुणे : पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणारे युवक आणि युवतीचे नाव समोर आले असून, या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पोलिसांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युवकाचे नाव मिहीर गांधी तर युवतीचे नाव मीनाक्षी साळुंखे असे आहे. रील व्हायरल झाल्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली आहे.

पुण्यातील नऱ्हे परिसराती स्वामी नारायण मंदिराजवळ जीव धोक्यात घालून मुलं-मुली रील्स बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. रिल पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. संबंधित व्हायरल रिल झालेल्या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच हा व्हिडीओ एप्रिल महिन्यातील असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोघांना पोलीस स्टेशनला बोलावून पोलिसांनी त्यांना समज दिली. गुरुवारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, मीनाक्षी साळुंखे हिच्या सोशल मीडिया अकाउंटवर असेच स्टंट करतानाचे व्हिडिओ आहेत. पोलिस त्याचाही तपास करत असून न्यायालयाच्या परवानगीने या दोघांवर कलम 308 अर्थात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यासाठी पोलीसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Video: पुणे शहरातील युवतीचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट…

पुणे शहरात घरातून निघून महिलेचा पाण्याच्या टँकरमध्ये आढळला मृतदेह…

पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त…

क्यों किया ऐसा मेरे साथ? प्रेयसीला लोखंडी पान्याचे 15 घाव घालून संपवलं…

Video: आईस्क्रीममध्ये बोटानंतर सापडली गोम…

पुणे शहरात पत्नीला लॉजवर घेऊन गेला अन् घात केला…

पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…

अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!