
आरोपी पत्रकाराचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील एका पत्रकाराने घाटंजी पोलिस स्टेशन मधील सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक विलास गोविंदराव सिडाम (वय 58) यांस 15,000 रुपयाची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपी कज्जूम कुरेशी (वय 44) विरुद्ध भारतीय न्याय संहिता 308 (2), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 ॲट्रोसीटी ॲक्ट 3 (1) (r), 3 (1) (S) 3 (2) (va) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात आरोपी कज्जूम कुरेशी याने यवतमाळचे जिल्हा न्यायाधीश – 2 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. लऊळकर यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, मंगळवारी आरोपी पत्रकार कज्जूम करीम कुरेशी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. नरेंद्र पांडे यांनी शासनाची बाजू मांडली.
सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने हे करित असुन, पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांचे पथक आरोपीला अटक करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा व नागपूर येथे पोलिस पथक रवाना झाल्याची विश्वासनिय माहीती प्राप्त झाली आहे.
पोलिस स्टेशन घाटंजीचे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम हे दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने सद्या ते संपूर्ण कुटूंबासह पोलिस स्टेशनच्या क्वार्टर मध्ये राहत होते. तथापि, दैनिक साहसिक व दैनिक मतदारचे घाटंजी वार्ताहर कज्जूम कुरेशी यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. तसेच सिडाम यांचे निवृत्ती वेतनाचे पैसे मिळायचे असल्याने ते पोलिस स्टेशनच्या सरकारी निवासस्थानी वास्तव्य करित आहे. तेव्हा, पत्रकार कज्जूम कुरेशी यांनी सिडाम यांना सांगितले की, तुम्ही सरकारी क्वार्टर सोडत नाही म्हणून ‘मी तुमची बातमी तयार केली आहे’. अगर पेपर में नही छापना है तो, मुझे 15,000 रुपये देना पडेगा, असे सिडाम यांना म्हटले. तेव्हा, सिडाम यांनी सांगितले की, मला एक दोन महिने सरकारी क्वार्टर मध्ये थांबायचे आहे. नंतर माझ्या घराचे बांधकाम झाल्यावर मी स्वतः सरकारी क्वार्टर सोडून देईन, असे सिडाम यांनी म्हटले. ‘अगर तुम पैसे नही दिये तो तुम्हारी बातमी मैं पेपरमें छापता’, अशी धमकी पत्रकार कज्जूम कुरेशी यांनी सिडाम यांना दिली. तेव्हा, सिडाम यांनी सद्या माझ्या जवळ 2,000 रुपये आहे. पैसे भेटायचे आहे. सद्या तंगी आहे, असे सिडाम यांनी सांगितले.
संबंधित पत्रकाराने मला 15,000 रुपये द्या म्हणून सिडाम यांच्या मागे तगादा लावला व सद्या 2000 रुपये तरी द्या. उर्वरित रक्कम उद्या द्या, असे पत्रकार कज्जूम कुरेशी यांनी सांगितले. तेव्हा, सिडाम यांनी म्हटले की, मेरे पास अभी पैसे नही जमते. बादमें देखेगें असे म्हणून सिडाम हे आपल्या क्वार्टरकडे निघून गेले. दिनांक 19 सप्टेंबर रोजी व्हाॅटसॲप ग्रुप वर विदर्भ मतदार या वृत्तपत्राचे एक बातमी आली. त्या बातमीत सिडाम हे राहत असलेल्या पोलिस स्टेशन क्वार्टरची बातमी कज्जूम कुरेशी यांनी प्रसारित केली होती, असा आरोप सिडाम यांनी केला. त्यामुळे पेपरला बातमी आल्याने सिडाम यांची मानहानी व बदनामी झाली, असे सांगितले. तसेच दिनांक 21 सप्टेंबर रोजी सिडाम हे मार्केट मध्ये भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. भाजीपाला घेऊन परत येतांना पोलिस स्टेशनच्या दाराजवळ पत्रकार कज्जूम कुरेशी हा बाजूला मोटार सायकल लाउन उभा होता. तेथुन सिडाम हे जात होते. तेव्हा संबंधित पत्रकार कज्जूम कुरेशी यांनी सिडाम यांना आवाज देउन थांबविले व म्हणाला की, ‘जम गई क्या बातमी’. तेव्हा सिडाम यांनी सांगितले की, ‘भैय्या मैने तुमको 2000 रुपये दिये और भी देता करके बोला था’. तो भी तुमने तुम्हारे पेपर में मेरे खिलाफमें बातमी प्रकाशित की है, असे म्हटले असता बाकी के पैसे अभी देदो, नही तो सभी पेपर में तुम्हारे फोटो सहीत बातमी लगायेंगे, अशी धमकी सिडाम यांना दिली. विशेष म्हणजे पत्रकार कज्जूम कुरेशी विरुद्ध या पुर्वीही घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असुन, त्यात खंडणीच्या गुन्ह्याचा समावेश आहे, हे येथे उल्लेखनीय.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने हे करित आहे. यवतमाळ न्यायालयात घाटंजी येथील आरोपी पत्रकाराचा जामीन अर्ज फेटाळल्याने यवतमाळ जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.
सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने केला पत्रकाराविरुद्ध खंडणी व ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल…
यवतमाळ येथील खुनाच्या खटल्यातील आरोपीला जामीन मंजूर…
यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी…
यवतमाळ येथील खुनाच्या खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता…
यवतमाळ जिल्ह्यात दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू…

