
लोणीकंद पोलिसांनी समलैंगिक संबधातून खून करणाऱ्याला केली अटक…
लोणीकंद, पुणे (संदीप कद्रे): समलैंगिक संबधातून २१ वर्षीय युवकाचा खून करणा-याला चेन्नईहून ट्रेनने परत येताच लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लोणीकंद पोलिस ठाणे हददीत २८/११/२०२३ रोजी दुपारी ०२/०० वा. चे सुमारास वाघोली परीसरातील बकोरी रोड येथील, बी जे एस कॉलेजमध्ये बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणा-या सागर गायकवाड (वय २१) याने कोयत्याने सपासप वार करुन त्याचा खून केल्याने त्याचे विरुध्द लोणीकंद पोलिस ठाणे गुन्हा रजि.क्रं. ९४२/२०२३ भा.द.वि.क. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ४ शशिकांत बोराटे, संजय पाटील, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग यांनी गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ भेट देवून नमुद गुन्हा उघडकीस आणण्याचे मार्गदर्शक सुचना दिल्या. लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता योग्य त्या सुचना देवुन तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे, सहा.फौ. बाळासाहेब सकाटे, पोलिस हवालदार संदेश शिवले, पोलिस नाईक स्वप्निल जाधव, पोलिस नाईक अजित फरांदे, कैलास साळुंके, पोलिस शिपाई अमोल ढोणे यांच्या नेतृत्वाखाली दोन तपासी पथके तयार केली.
तपासात नमुद आरोपी व मृत युवकाचे गेल्या २ वर्षांपासून एकमेकांचे संपर्कात असल्याचे व त्यांच्यामध्ये समलैंगिक संबंध असल्याची माहिती मयताच्या मित्राकडून सपोनि गोडसे व पथक यांना मिळाली. तसेच मयत युवकाने आरोपी सोबत समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन चिडुन आरोपीने मयत युवकाचा खून केल्याचा तपासामध्ये निष्पन्न झाले. तपासात आरोपी हा गुन्हा करुन फरार झाल्यानंतर गुन्हयात वापर केलेल्या मोटार सायकलवरुन तो त्याचे राहते गावी पारगाव (ता. दौंड) येथे जावून त्याची मोटार सायकल केडगाव येथे ठेवून पळुन गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याप्रमाणे आरोपीचा उरुळीकांचन, थेऊर, पारगाव, केडगाव, यवत, पाटस, दौंड इत्यादी परीसरात सलग तीन दिवस त्याचे मित्र, नातेवाईक यांचेकडे त्याच्या ठावठिकाणाबाबत तपास करुन आरोपीचा अहोरात्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीच्या सध्याच्या ठावठिकाणाचा शोध घेण्यात यश मिळाले नाही.
तपासा दरम्यान सपोनि गोडसे व पथक यांनी आरोपी हा व्यवसायाने इंजिनिअर असून त्याने मुंढवा, पुणे, मध्यप्रदेश, गुजरात इत्यादी ठिकाणी काम केल्याबाबत माहिती प्राप्त करुन आरोपीचा शोध घेत असताना नमुद आरोपी हा ०१/१२/२०२३ रोजी चेन्नई येथुन पुण्याचे दिशेने रेल्वेने येत असल्याची गोपनिय माहीती प्राप्त झाली. सदरची माहिती प्राप्त होताच सपोनि गोडसे, सहा.फौ. सकाटे, पो.ना. जाधव, फरांदे यांनी दौंड रेल्वे स्टेशन परीसरात जावुन सापळा रचला. परंतु, आरोपी मौजे गारगाव रेल्वे फाटक येथील सिग्नलला रेल्वे थांबल्याने तो रेल्वेतून खाली उतरुन निसटुन जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास पाटस दौंड रोड, पाटस टोलनाका जवळ, पाटस ता. दौंड
येथे आरोपीस शिताफिने ताब्यात घेऊन त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, शशीकांत बोराटे, पोलिस उप-आयुक्त सो, परिमंडळ ४, पुणे शहर, संजय पाटील, सहा. पोलिस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली विश्वजित काइंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस स्टेशन, पुणे शहर, मारुती पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे), रविंद्र गोडसे, सहा.फौ. बाळासाहेब सकाटे, पोलिस हवालदार, संदेश शिवले, पोलिस नाईक स्वप्निल जाधव, अजित फरांदे, कैलास साळुंके, पोलिस शिपाई अमोल ढोणे सर्व लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.
लोणीकंद पोलिसांनी २७ लॅपटॉप केले जप्त; १८ गुन्हे उघड…
लोणीकंद पोलिसांची हातभट्टीवर कारवाई; पोलिसांचे आवाहन…
लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश…
लोणीकंद पोलिसांनी वेशांतर करून पीएमपीएल बसमध्ये चोरी करणाऱ्यास पकडले…
लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!