सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदीप कद्रे): सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणा-या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन गुन्हे उघड केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सदर बाबत अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर २०२३ मध्ये सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत वडगाव या परीसरात दिवसा घरफोडी च्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुध्द तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा सिंहगड रोड पोलिस स्टेशन चे पोलिस अधिकारी व अंमलदार हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुप्त बातमीदारामार्फत तसेच सदर परिसरामधील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करुन आरोपींचा सखोल तपास करीत असताना सदरचा आरोपी हा मुंबई येथील सराईत घरफोडी चोरी करणारा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते.

सदर आरोपीचा मागोवा घेत असताना तपास पथकातील अंमलदार सागर शेडगे, देवा चव्हाण, अविनाश कोंडे हे सदर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत असताना त्यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दिवसा घरफोडी करणारा हा अंगामध्ये काळ्या रंगाचा टि-शर्ट व काळया रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेला रघुनंदन हॉल पुणे मुंबई बेगलोंर हायवे चे सर्व्हिस रोडवर पडीक मोकळ्या जागेच्या समोर सार्वजनिक रोडवर थांबलेला आहे. सदरची बातमी वरिष्ठांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिले.

सपोनि सचिन निकम यांनी सोबतच्या स्टाफ सह सदर ठिकाणी जावुन सापळा रचला. सदर व्यक्तीला चाहुल न लागू देता त्याला आहे त्या परिस्थीतीत वरील स्टाफचे मदतीने २१/११/२०२३ रोजी २१.१५ वा.ताब्यात घेतले. रोहित चेतन शेट्टी (वय २७ वर्षे, रा.०८ एनआर १ आगासन रोड, जवळ शॉपर्स स्टॉप, दिवा ठाणे. सध्या रा. रुम नं.४ हिना पार्क रोड, एचपी पंपाजवळ शिळफाटा, ठाणे) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे विचारपुस करता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवुन काही एक उपयुक्त माहीती सांगत असल्याने त्याच्याकडे जागीच येथे येणेबाबत सखोल तपास करता त्याने चोरी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास २१/११/२०२३ रोजी २२/१० वा. अटक करुन त्यांची पोलिस कस्टडी रिमांड घेतली. तपास करता त्याने चोरी केलेले दागिणे त्यांची मैत्रीण आलिझा ताहीर सय्यद (वय २२ वर्षे रा. मुंबई) हिच्याकडे विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. सदर महिलेस अटक करुन त्यांच्याकडे पोलिस कस्टडी मध्ये तपास करता त्यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथील दोन गुन्ह्यातील मुद्देमाल मुंबई येथे विक्री केल्याचे सांगितल्याने मुंबई येथे जावुन सिंहगड रोड पोलिस स्टेशन कडील दोन गुन्ह्यातील ३,२०,०००/- रुपये किंमतीचे ९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी रोहीत चेतन शेट्टी यांच्यावर मुंबई व पुणे या शहरात घरफोडीचे एकुण १४ गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपीकडुन सिंहगड रोड पोलिस स्टेशन कडील दोन गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक, सचिन निकम सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी सुहेल शर्मा, पोलिस उप-आयुक्त परीमंडळ -३, आप्पासाहेब शेवाळे, सहा पोलिस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, अभय महाजन, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, जयंत राजुरकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलिस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, देवा चव्हाण, सागर शेडगे, अविनाश कोंडे, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील यांचे पथकाने केली.

प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल…

नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल…

पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…

युवतीशी चॅटींग आणि गोड बोलण्याला भुलला युवक अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!