Video! पुण्यातील गावगुंडाकडून अभिनेत्रीला लुटण्याचा प्रयत्न…

पुणे: ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत मामीची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर या मुंबईहून साताऱ्याला जात असताना पुण्यातील नवले ब्रिजजवळ 4 गावगुंडांनी अडवले. जबरदस्ती गाडी ठोकून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीचा हात ओढून जबरदस्ती त्यांच्या गाडीतून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीने सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत त्यांच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. नऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये या गावगुंडांच्या विरोधात मी तक्रार दाखल केल्याचंही त्यांनी व्हिडिओतून म्हटले आहे.

अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांनी सांगितलं ‘ नमस्कार. मी कल्याणी नंदकिशोर.मला तुम्हा सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचाय आजही महिला का सुरक्षित नाहीत? काल मुंबईवरून साताऱ्याला येताना पुण्यात नवले ब्रिजच्या खाली चारगाव गुंडांनी माझ्या गाडीसमोर जबरदस्तीने गाडी आडवी घातली. जबरदस्तीने गाडी ठोकली. माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पैसे उकळता आले नाहीत त्यावेळी जबरदस्तीने माझा हात ओढून त्यांच्या गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.’ अभिनेत्रीने त्यांचा हातावरच्या जखमा दाखवल्या.

त्या पुढे म्हणाल्या ‘कुठे आहे महिला सुरक्षा? आज आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार एक महिला आहेत. असं असलं तरी महिला सुरक्षित नाहीत. मी कलाकार आहे, म्हणून मी आज व्यक्त होऊ शकते. मी हे माझे एकटीसाठी व्यक्त होत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांसाठी व्यक्त होतेय.माझ्यासह महाराष्ट्रातली एकही महिला सुरक्षित नाही. ना ती एकटी सुरक्षित आहे ना त स्वतःच्या कुटुंबासोबत सुरक्षित आहे. ना ती गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित आहे. या गावगुंडांवर कधी कारवाई होणार आहे? हे गावगुंड येतात काय, माझ्यावर जबरदस्ती करतात काय.. जबरदस्तीने माझी गाडी ठोकतात काय, मला पळवून नेण्याचा प्रयत्न करतात काय आणि वर स्वतः पळून काय जातात..ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या या गावगुंडांवर कधी आळा बसणार आहे? ज्यावेळी मी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा पोलीस स्टेशनला मी अकरा वाजता गेले होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

“पहाटे 6 वाजेपर्यंत ते एफआयआर आणि तक्रारच दाखल करत बसले होते. त्याच्यामधली प्रोसिजर – मेडिकल करा त्यासाठी ससून रुग्णालयात जा. तिथून मेडिकल सर्टिफिकेट आणा. ते पोलीस ठाण्यात आणून द्या. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी महिलेला एकटीला असंच पडावं लागणार आहे का? माझ्यासोबत माझं कुटुंब होतं म्हणून ठीक आहे. माझ्याऐवजी दुसरी महिला असली असती तरी तिने काय केलं असतं. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना महिला आयोगाला कळकळीची विनंती आहे, या प्रकरणांमध्ये त्यांनी व्यवस्थित लक्ष घालावे. या गावगुंडांना लवकरात लवकर पकडून आणावं. लवकरात लवकर त्यांच्यावर ठोस कारवाई करावी.’ अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांनी सांगितलं.

अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांनी पोस्टमध्ये शेवटी म्हटले आहे की, सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट ही की त्यांच्या घरचे तक्रार दाखल करू नका म्हणून सेटलमेंट करायला येतात ‘अरे कुठे विकली लाज’. दरम्यान,अभिनेत्रीचा सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

अभिनेत्री संचिता उगले हिचे चॅट समोर, आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…

देवाच्या कृपेने एका स्कॅममधून वाचले : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!