
हृदयद्रावक! पत्नीचं निधन अन् चार मुलींसह बापाने संपवलं स्वत:ला…
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील रंगपुरी नावाच्या गावात एका व्यक्तीने चार मुलींसोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फ्लॅटचे कुलुप तोडून मृतदेह बाहेर काढले. चारही मुली दिव्यांग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना चालता-फिरता येत नव्हते. पत्नीच्या मृत्यूनंतर मुलींची अवस्था बघून बाप हतबल झाला होता. त्याने मुलींना सल्फास खायला घातले आणि त्यानंतर स्वत:ला संपवून घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हीरालाल हे कुटुंबासह रंगपुरी गावातील घरात भाड्याने राहत होते. ते मूळचे बिहारच्या छपरा जिल्ह्यातले रहिवासी होते. पत्नीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात चार मुलींपैकी सर्वात लहान मुलगी ८ वर्षांची, दुसरी १०, तिसरी १५ तर मोठी मुलगी १८ वर्षांची होती. हीरालाल वसंत कुंज इथल्या एका रुग्णालयात सुतारकाम करत होते. शुक्रवारी त्याच्या फ्लॅटमधून कुजल्याचा दुर्गंध यायला सुरुवात झाली. शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला.
पोलिस वसंत कुंज इथल्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा लोकांनी हीरालालचे कुटुंबिय अनेक दिवसांपासून दिसले नसल्याचे सांगितले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर प्रचंड दुर्गंधी येत होती. खोलीत बेडवरच हीरालालचा मृतदेह होता. तर दुसऱ्या खोलीत चार मुलींचे मृतदेह होते. हीरालालच्या मोठ्या भावाला याची माहिती दिली. घटनास्थळी सुसाइड नोट सापडलेली नाही. पण, मुली दिव्यांग असल्याने आणि एकट्या बापाला त्यांची काळजी घेणे शक्य नसल्याने हीरालालने हे पाऊल उचलले असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हीरालालची पत्नी सुनीता यांना कर्करोग झाला होता. त्यांचा मृत्यू झाला आहे. पहिली मुलगी दिव्यांग झाली होती. निरोगी अपत्य असावं म्हणून त्यांनी आणखी अपत्यांना जन्म दिला. मात्र त्यानंतर तीन मुलीही दिव्यांगच जन्मल्या. त्यांचे पालनपोषण पत्नीच्या मृत्यूनंतर हीरालाल एकटाच करत होता.
हृदयद्रावक! शिक्षिकेने उदार मनाने आपल्या यकृताचा काही भाग केला दान अन्…
हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं…
हृदयद्रावक! ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…

