
पुणे शहरातील आंदेकर टोळीच्या प्रमुखासह ९ जणांना अटक; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन जीवे ठार मारणाऱ्या आंदेकर टोळीच्या टोळी प्रमुखासह एकूण ९ आरोपींच्या समर्थ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाना पेठेत काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीतीलसराईतांनी दोघांवर शस्त्राने वार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. त्याच आंदोकर टोळीतील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह नऊ जणांच्या समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीतील तीन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
सोमवारी (ता. २) सांयकाळी ०३.०० वा. चे सुमारास जखमी १) निखील सखाराम आखाडे व २) अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते हे सोमनाथ गायकवाड (रा. नानापेठ पुणे) याचे पत्नीस भेटण्यासाठी आले होते. जखमी अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते हे सोमनाथ गायकवाड याचे मित्र असल्याने गुन्हयातील आरोपी यांचेमध्ये काही महिन्यापुर्वी आपआपसात भांडणे झाली होती. म्हणून त्या भांडणाचा राग डोक्यात घेवून यातील मयत निखील सखाराम आखाडे व जखमी अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते हे सोमनाथ गायकवाड याचे पत्नीस भेटण्यास आले असल्याची माहिती आंदेकर टोळीस मिळाल्याने आंदेकर टोळीचे प्रमुख बंडु आण्णा उर्फ सुर्यकांत राणोजी आंदेकर, कृष्णराज सुर्यकांत आंदेकर, तुषार निलंजय वाडेकर व स्वराज निलंजय वाडेकर यांनी त्याचेकडे काम करणारे रामजी गुजर, आकाश पैलवान, आयुष बिडकर, आमीर खान, यश पाटील, अमित पाटोळे याच्यासोबत कट रचून नियोजनबध्दरीत्या निखील सखाराम आखाडे व अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने दिनांक ०२/१०/२०२३ रोजी ०४.०० वा. सुमारास सोमनाथ गायकवाड याचे पत्नीस भेटून परत जात होते.
शितळादेवी मित्र मंडळाजवळील रोडवर गणेश पेठ पुणे येथे रामजी गुजर, आकाश पैलवान, अमित पाटोळे, यश पाटील, आयुष बिडकर, आमीर खान, यानी हातोडयाने, लोखंडी रॉड स्क्रु ड्रायव्हर ने वार करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केले म्हणून समर्थ पोलिस ठाणे गु.र.नं. २१८ / २०२३ भा.दं.वि.सं कलम ३०७, ३२६, ३४१, ५०६, १२० (ब), १४३, १४७, १४९ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५ सह फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम १९३२ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तपास पथकाचे पोउनि / सुनिल रणदिवे, पोउनि/सौरभ माने, पोउनि/सौरभ थोरवे यांचे पथकाने तात्काळ दहशत निर्माण करणारे पुढील १० आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यामध्ये
१) सुर्यकांत उर्फ बंडु आण्णा राणोजी आंदेकर वय ६७ वर्ष, रा. २१ नानापेठ, डोके तालीम मागे, पुणे
२) कृष्णराज उर्फ कृष्णा सुर्यकांत आंदेकर वय ३३ वर्ष, रा. २१ नानापेठ, डोके तालीम मागे, पुणे
३) तुषार निलंजय वाडेकर, २४ वर्ष, रा. २८, नानापेठ, डोके तालीमचे पाठीमागे पुणे,
४) स्वराज निलंजय वाडेकर, २० वर्ष, रा. २८, नानापेठ, डोके तालीमचे पाठीमागे पुणे,
५) पुराराम दियाराम गुजर,
६) आकाश रामदास खरात उर्फ पैलवान,
७) आयुष संतोष बिडकर,
८) आमीर आसीर खान,
९) यश सिध्देश्वर पाटील यांचा शोध घेवुन त्यांना तात्काळ अटक केली आहे. तसेच फरार झाले आरोपी अमित प्रकाश पाटोळे व इतर आरोपीचे नाव निष्पन्न करुन त्याचा शोध घेणेकामी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. सदर गुन्हयातील जखमी निखील सखाराम आखाडे याचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने सदर गुन्हयात भा.दं.वि. सं कलम ३०२ प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे.
आरोपींच्या दहशतीमुळे नागरीक नागरीकांनी न घाबरता पोलिसांना माहिती दयावी त्यावर पुणे पोलिस कोणत्याही गुन्हेगारांची गय न करता नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह-आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उप-आयुक्त संदीप सिंह गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर व अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग यांनी केलेले आहे.
सदरची कामगिरी ही प्रविण पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग संदीप सिंह गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ १, पुणे शहर, अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, प्रमोद वाघमारे, पोलिस निरीक्षक, (गुन्हे) यांचे सुचने नुसार सहा. पो. निरी / दादासाहेब पाटील, सपोनि/संजय माळी, तपास पथकाचे पोउनि / सुनिल रणदिवे, पोउनि / सौरभ माने, पोउनि सौरभ थोरवे सपोउनि/ दत्तात्रय भोसले, पोहवा / गणेश वायकर, पोहवा / प्रमोद जगताप, पोहवा / रोहीदास वाघीरे, पोहवा/ संतोष ढमाळे, पोहवा / गणेश साळवे, मपोहवा / निलम कर्पे, पोना/ रहिम शेख, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे, प्रफुल्ल साबळे, कल्याण बोराडे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शरद घोरपडे, कपिल चौरे, अमोल शिंदे यांनी केली आहे.
धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…
पुणे शहरातील कोयता हल्लेखोर आरोपीला जामीन मंजूर…
पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…
पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…
समर्थ पोलिसांनी १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सराईतांना ठोकल्या बेड्या…