
पुणे शहरात अट्टल घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस पोलिसांनी केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील व अट्टल घरफोडी करणाऱ्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून एकूण 4 घरफोडीचे गुन्हे उघड केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
आगामी 2024 विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी वरिष्ठांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविणेबाबत आदेशित केले आहे. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे अभिलेखावरील पाहिजे/फरारी/तडीपार व मोका मधील आरोपींचा शोध घेऊन मिळून आल्यास त्यांचेवर कारवाई करणेबाबत सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने इकडील पथकाकडील Api प्रवीण काळुखे व अंमलदार असे समर्थ, फरासखाना व खडक पो. स्टे. चे हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते.
पेट्रोलिंग दरम्यान स्टाफमधील पो. ना. 7559 रविंद्र लोखंडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोंढवा पो.स्टे. गु.र.नं 867/2024, भा.न्या.सं.क. 331(4), 305 या दाखल गुन्ह्यातील व गेले 6 ते 7 महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपी तौसिफ बशीर शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे व सध्या रा. शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे) हा 10 नं कॉलनी, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे एका रिक्षामध्ये बसला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. वपोनि नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांचे परवानगीने सदर ठिकाणी जावून पाहिजे आरोपी मिळून येताच त्यास ताब्यात घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
प्राप्त बातमीचे अनुषंगाने अधिकारी व स्टाफ असे बातमीचे ठिकाणी जावून सापळा रचून त्यास आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. त्यास अधिक विश्वासात घेऊन त्याचेकडे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी करता सदरचा गुन्हा हा त्याने त्याचे इतर साथीदार यांचेसह मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तो खालील नमूद पो.स्टे. कडील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
1) कोंढवा पो.स्टे. गु.र.नं 867/2024, भा.न्या.सं.क. 331(4), 305
2) कोंढवा पो.स्टे. गु.र.नं 853/2024, भा.न्या.सं.क. 331(4), 305
3) कोंढवा पो.स्टे. गु.र.नं 940/2024, भा.न्या.सं.क. 331(4), 305
4) सिहंगड रोड पो.स्टे. गु.र.नं 423/2024, भा.न्या.सं.क. 331(3), 331(4), 305
असे एकूण 04 घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याने व त्याने दाखल गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाईकरिता कोंढवा पो. स्टे. पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश; पाहा 58 नावे…
संजय वर्मा राज्याचे नवे पोलिस महासंचालक…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

