परभणीत हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी…

परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी झाले आहेत. सभा मंडप कोसळल्याने या मलब्याखाली 30 ते 40 जण दबल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य सुरु करण्यात आली आहे. अनेक अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सभामंडप कोसळल्याने या मलब्याखाली 30 ते 40 जण अडकले होते. यातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक शनिवारी मोठ्या प्रमाणात या मंदिरात गर्दी होत असते. अशातच आज देखील या मंदिरात मोठी गर्दी झाली होती. अशा वेळीच सभामंडप कोसळले असून, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेतील जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सभामंडपात काही भाविक मारूतीसमोर हात जोडून उभे होते. त्यावेळी परिसरात सुरू असलेल्या सभा मंडपाच्या बांधकामाचा एक मोठा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. पिलर आणि छताचा राडारोडा थेट खाली उपस्थित असलेल्या भाविकांवर पडला. या राडारोड्यात अनेक भाविक दबले गेले. काही कळण्याच्या आताच मोठा अनर्थ घडला आहे. अचानक छत कोसळल्या भाविकांना बाहेर पडता आले नाही आणि ते या ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहचले. मात्र, मंदिराचा रस्ता अरुंद असल्याने बचाव पथकाला घटनास्थळी पोहचण्यात मोठी कसरत करावी लागली. सध्या स्थानिकांच्या आणि बचाव पथकाच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, छताचा मोठा भाग कोसळल्यामुळे काही भाविक अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, प्रत्येक शनिवारी या हनुमान मंदिरात 25 ते 50 हजार भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणच्या सभामंडपाचे काम जवळपास पूर्णत्वास आले होते. पण, अचानक सभा मंडप कोसळले आहे. क्रेनच्या सहाय्याने तेथील दगड हटवण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर याखाली किती भाविक अडकले याची माहिती समजू शकेल.

Video: तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू…

ओंकारेश्वर मंदिराची उघडलेली दानपेटी चोरट्यांनी फोडली; सुमारे 6,000 रुपये चोरले

थांबा! राम मंदिराच्या नावावर फ्री रिचार्जची लिंक आली आहे…

Video: शिमलातील शिव मंदिर कोसळून नऊ जणांचा मृ्त्यू तर अनेकजण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!