
गायक सोनू निगम याच्या विरोधात गुन्हा दाखल; काय केलं वक्तव्य पाहा…
मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्या विरोधात वादग्रस्त विधानामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 25 एप्रिल 2025 रोजी बेंगळुरूच्या ईस्ट पॉइंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे झालेल्या संगीत कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे कन्नड समुदायामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
कार्यक्रमादरम्यान एक चाहता सोनू निगमला वारंवार कन्नड गाणं गाण्याची विनंती करत होता. मात्र ही मागणी सतत होत असल्यामुळे सोनूने ती नाकारली आणि यानंतर दिलेल्या उत्तरामुळे वाद उफाळून आला. सोनू म्हणाला, “पहलगाममध्ये जे घडलं, तेच इथेही होतंय… तू काय करत आहेस ते बघ!”
सोनू निगम याच्या या विधानामुळे कन्नड समाजात संतापाची लाट उसळली. कर्नाटक रक्षण वेदिके (केआरव्ही) या संघटनेने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केली आहे. तक्रारीनुसार, “सोनू निगमने एका साध्या भाषिक मागणीला दहशतवादी घटनेशी जोडलं जे अत्यंत असंवेदनशील आणि समाजात द्वेष पसरवणारे आहे.” KEVR च्या तक्रारीत म्हटलs आहे की, सोनू निगम यांनी कन्नड समुदायाबद्दल असहिष्णुता दर्शवली. त्यांच्या विधानामुळे भाषिक आणि सांस्कृतिक सलोखा धोक्यात आला आहे. अशा वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, सोशल मीडियावर सोनू निगमवर सध्या जोरदार टीका होत आहे. अनेक कन्नड नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोनू निगम याने अजून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
View this post on Instagram
गायक उदित नारायण यांचा आणखी एक किसिंगचा Video Viral…
अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…
प्रसिद्ध अभिनेत्याला केली अटक; मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश…
अभिनेता सैफ अली खानने जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याची घेतली भेट…
साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…

