डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप…

परभणी : जिंतुर शहरातील युवकाचा डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे, असा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व खाजगी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह मीण रुग्णालयात ठेऊन गोंधळ घातला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन समितीचा अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्यांनतर हा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.

जिंतुर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राहणारा राजरत्न कैलास वाकळे (वय 26) यास दोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते. मात्र, ताप कमी होत नसल्यामुळे त्यास खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर नातेवाईकांनी खाजगी डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर त्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. पुढील उपचारासाठी परभणी येथे घेऊन जाण्यास सांगितले होते. यावेळी रुग्णवाहिकेने नेत असताना रस्त्यात युवकाचा मृत्यू झाला.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

युवकाच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मृतदेह खाजगी दवाखान्यासमोर ठेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले होते. यावेळी शवविच्छेदन करून नातेवाईकांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून गोंधळ घातला. यावेळी खाजगी डॉक्टर व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मोठा जमाव जमला होता. यावेळी पोलिस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला होता.

राजरत्न या युवकाच्या मृत्युमुळे गायकवाड कुटुंबीय आणि नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. डॉक्टरांविरोधात तातडीने तक्रार केली शिवाय त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणीदेखील कुटुंबीयांनी केली आहे.

पोलिसकाका Video News: २६ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…

दिशा भोईटे मृत्यू आणि शवविच्छेदन अहवालाबाबत सविस्तर माहिती…

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…

ससूनचा डॉ. अजय तावरे अन् अमर मकानदारमध्ये ७० कॉल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!