वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड हे गेल्या ३१ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. विविध भागांमध्ये धडाकेबाज कारवाया करताना त्यांच्यामुळे ३० कुख्यात गुन्हेगारांना कारावासाची शिक्षा मिळाली आहे. श्री. कड यांनी केलेल्या उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल दोन वेळा राष्ट्रपती पोलिसपदक विजेते ठरले असून, ५७१ बक्षिसे मिळाली आहेत. कोरोना काळात काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना झालेले पोलिस दलातील ते पहिले अधिकारी आहेत. मृत्यूशी झुंज देत त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला आणि कोरोनाला हरवले. शिवाय, आपण लढवय्ये असल्याचे दाखवून दिले. कोरोनावर मात करून ते पुन्हा पोलिस दलात दाखल झाले असून, मोठ्या जोमाने काम करत आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात…

मधुकर कड यांचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुरुळवाडी हे गाव. शेतकरी कुटुंबातील जन्म. पोलिस अधिकारी होईल असे कधी त्यांना वाटले नव्हते. पण, ऍग्रिकल्चर करत असताना तेथील पोषक वातावरणामुळे स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात पास झाले. पोलिस अधिकारी म्हणून करत असताना मोठमोठ्या कारवाया केल्या आहेत. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिसपदक जाहीर झाले आहे. कड यांना यापूर्वीही उत्कृष्ट पोलिस सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिसपदकाने सन्मानित केले आहे.

शिक्षण :
१ ते ४थी – मुरुळवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर
५ ते १२ – अहमदनगर
बी. एस्सी – ऍग्रिकल्चर कॉलेज, पुणे
एम. एस्सी – राहुरी, जि. अहमदनगर

पोलिस दलातील कार्यकाळ :
१९९३ ते २००३ – नागपूर
२००३ ते २००५ – परवी शहर पोलिस स्टेशन
२००५ ते २००९ – औरंगाबाद ग्रामीण
२००९ ते २०१० – घोटी, इगतपुरी, नाशिक
२०१० ते २०१४ – एटीएस, नाशिक
२०१४ ते २०१९ – भद्रकाली, नाशिक
२०१९ ते २०२१ – मुंब्रा पोलिस
२०२१ ते २०२३ – उल्हासनगर, वागळे इस्टेट
२०२४ – पंचवटी पोलिस स्टेशन, नाशिक

मधुकर कड हे पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा पास झाले आणि यांची १९९२ मध्ये उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. १९९३ ते २००३ दरम्यान ते अतिसंवेदनशील लकडगंज पोलिस स्टेशन, नागपूर आणि खंडणीविरोधी पथक, तसेच नागपूर शहरात असताना कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय कुशलतेने त्यांनी हाताळली होती. खून, खंडणी प्रकरण, घरफोडी, फसवणुकीसारख्या गुन्ह्यांमधील अनेक आरोपींना त्यांनी जेरबंद केले होते. गुन्हेगारी टोळ्या आणि अमली पदार्थांचाही त्यांनी नाश केला होता. त्यांच्या तपासामुळे ३० कुख्यात गुन्हेगारांना कारावासाची शिक्षा मिळाली आहे.

धडाकेबाज कारवाया…
औरंगाबादमधील परळी आणि करमाडमध्येही त्यांनी आंतरराज्यीय बनावट नोटांचे रॅकेटही पकडले होते. औरंगाबादच्या शस्त्रसाठा प्रकरणाचा छडा, तसेच दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) मुंबईमध्ये असताना मुंबई झवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरण, एमपीए नाशिक रेकी प्रकरण, जंगली महाराज रोड पुणे बॉम्बस्फोट , नक्षलवादी प्रकरणातील आरोपींना अटक करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. नाशिक आणि ठाणे शहरात नेमणुकीस असताना जातीयदृष्ट्या संवेदनशील भद्रकाली, अंबड, पंचवटी आणि मुंब्रा पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून जातीय सलोखा राखण्यात त्यांना यश आले होते. चार खुनाच्या गुन्ह्यांमधील आरोपींना त्यांच्या तपासामुळे शिक्षाही झाली. यापूर्वीही राष्ट्रपतीपदक उल्लेखनीय कामगिरीबाबत कड यांना ५७१ बक्षिसे मिळाली. त्यातील चार लाख २० हजार ४२५ रोख स्वरूपाची, तर ५१४ सी नोटस आणि ४२ प्रशंसापत्र मिळाली. २००८ मध्ये पोलिस महासंचालकांचे पोलिस पदक आणि २०१७ मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीपदकही त्यांना प्राप्त झाले. मुंब्रा पोलिस ठाण्यात कोरोना काळातही त्यांची उत्कृष्ट कामगिरी झाली. आतापर्यंतच्या सर्वच कार्याची दखल घेत त्यांना यंदा उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल राष्ट्रपतींचेपोलिसपदक जाहीर झाले आहे.
– नागपूरमध्ये संतोष आंबेकर हा कुख्यात गुंड सापडत नव्हता. श्री. कड यांनी त्याला प्रथमच अटक केली. पुढे त्याच्यासह चार जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली.
– एटीएसमध्ये असताना पहिला मोक्का केला.
– नक्षलवाद्याला पकडले
– मुंब्रा येथील बनावट नोटा प्रकरण उघडकीस आणले.

कोरोना झालेले पोलिस दलातील ते पहिले अधिकारी…
सन २०२०मध्ये जगभरात कोरोना पसरू लागला होता. विविध देशांमध्ये लॉकडाऊन लागत होता. जगभर भिती पसरू लागली होती. कोरोनामुळे अनेकांचा जीव जात होता. कोणाला काही समजत नव्हते. भारतात कोरोनाने शिरकाव केला आणि एकच हाहाकार उडाला. लॉकडाऊन लागला. नागरिक घरांमध्ये बंदिस्त होऊ लागले आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर आली. कोरोना काळात पोलिस रात्रंदिवस रस्त्यांवर उभे राहिले होते. नागरिक जवळची नाती विसरू लागले होते. पोलिस मात्र जिवावर उदार होऊन रस्त्यावर उभे होते. या काळात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. काही पोलिसांना जीव गमवावा लागला तर काही जण पुन्हा सेवेत दाखल झाले.

महाराष्ट्रात कोरोना झालेले पोलिस दलातील पहिले अधिकारी म्हणजे मधुकर कड. त्या वेळी ते मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. मोठ्या संकटातून ते सहिसलामत बाहेर पडले. कोरोना झाला असताना विविध प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. खरोखरच हा दुसरा जन्म असल्याचे सांगतात. कोरोनादरम्यान आलेला अनुभव सांगत असताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. त्यांनी आजाराचा सामना कसा केला? मानसिक ताणतणावातून त्यांना कसं जावं लागलं? याबाबत त्यांनीच सांगितलेला अनुभव पुढीलप्रमाणे…

कोरोनादरम्यान आपल्याकडे काय होणार आहे, याची पुसटशी कल्पना मला आली होती. तोपर्यंत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग किंवा माहिती पोहोचली नव्हती. देशभरात 22 मार्च २०२० ला लॉकडाऊन जाहीर झाला आणि आमची जबाबदारी वाढली. मुंब्रामध्ये नेहमीपेक्षा अधिक गस्ती सुरू झाल्या. भाजी मार्केट, किराणा, मेडिकल दुकानं अशा अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी नियमांचं पालन नीट होतंय का, याची पाहणी आम्ही करत होतो. हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यावर माझ्यासह इतर सहकाऱ्यांचाही कटाक्ष होता. 30 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान आमच्या कामाचे तासही खूप वाढले. इतर गुन्ह्यांचा तपासही सुरू होता. सकाळी सुरू झालेलं काम रात्री 11 वाजता संपायचं. सगळेच जण जीव ओतून काम करत होते.

लॉकडाऊनपूर्वी मुंब्रामध्ये बाहेरून आलेल्या आणि गेलेल्या लोकांची यादी आम्हाला मिळत होती. त्यानुसार त्यांच्यावर लक्ष ठेवत होतो. नाकाबंदी, क्वारंटाईन करणं या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्या दरम्यान मुंब्रा येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. लोकांनी नियमांचं पालन करावे म्हणून कडेकोट बंदोबस्त सुरू होता.

नाशिकला कुटुंब आणि ठाण्यात बदली झाल्यामुळे मुक्काम कळव्याला असायचा. सुट्टीच्या दिवशी घरी जाणं व्हायचं. जवळपास पंधरा दिवस कामाचे तास वाढल्याने झोपही चार-पाच तास मिळत होती. 5 एप्रिल २०२० च्या सकाळी अचानक घसा दुखायला लागला. ते दुखणं एरव्हीसारखं नव्हतं. मनात वाटूनही गेलं आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नसेल? पण मी स्वतःची खूप काळजी घेत होतो. घशाला सूज होती, ताप नव्हता, पण थोडं ब्लडप्रेशरही वाढल्यासारखे वाटू लागलं. खासगी डॉक्टरनी येऊन तपासले तेव्हा खरंच माझं ब्लड प्रेशर वाढलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून त्या दिवशी रात्रीच मी नाशिकला घरी परतलो.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!