सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
डॉ. सीताराम कोल्हे हे गेल्या ३२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, त्यांनी विविध गुन्हे उघड केले आहेत. ७५० बक्षिसे १२५ प्रशंसापत्रे मिळाली असून, पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, तसेच प्रतिष्ठेचा ‘गिरणा गौरव पुरस्कार’ व ‘पंचवटीरत्न पुरस्कार’ मिळाला आहे. पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतीपदकाने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल्समध्ये त्यांचे 14 रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत. पोलिस दलातील स्वच्छंदी जीवन जगत असलेला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात…

डॉ. सीताराम कोल्हे हे वयाच्या २५व्या वर्षी कोणताही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पोलिस अधिकारी पदाला गवसणी घातली. कुटुंबातील ते पहिलेच पोलिस अधिकारी ठरले आहेत. त्यांचा संघर्षमय प्रवास आहे. पण, त्यांनी कधीही तो चेहऱ्यावरून दाखवून दिला नाही. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारा. सर्वसामान्य नागिरकांना न्याय मिळवून देणारा अधिकारी आहे. नेहमीच दुसऱ्याचा विचार करून मदतीचा हात पुढे करणारा अधिकारी, अशी त्यांची ओळख आहे.

शिक्षण…
१ ते ७वी – जि.प. प्राथमिक शाळा लोणी
८ ते १०वी – न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर
११ ते बीएसस्सी – अहमदनगर
एमएसस्सी – पुणे विद्यापीठ, एमबीए, पुणे, एम.एम. (मानसशास्त्र), पुणे विद्यापीठ, पीएच.डी. (मानसशास्त्र), एनएमयू जळगाव, विद्यापीठ.

पोलिस दलातील कार्यकाल…
१९९२ साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात रुजू झाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिले पोस्टिंग त्यांचे अमरावती येथे झाले होते. पुढे नागपूर, जळगाव, नंदूरबार, नाशिक ग्रामीण, सीआडी आणि सध्या नाशिक शहर पोलिसमध्ये सहाय्यक पोलिस आयु्क्त म्हणून कार्यरत आहेत.

संघर्षमय प्रवास…
आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता यशाचं कोणतही शिखर गाठण्यासाठी आपल्या मनात जिद्द आणि चिकाटी जर असेल ना तर खडतर परिस्थितीतही आपण सहज यश प्राप्त करू शकतो. पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतीपदकाने सन्मानित झालेले डॉ. सीताराम कोल्हे यांनी हे दाखवून दिले आहे. आपल्या कुशल कामगिरीने महाराष्ट्र पोलिस दलाची शान वाढविणाऱ्या डॉ. सीताराम कोल्हे यांचा आजपर्यंतचा प्रवास अतिशय थरारक आहे. खडतर परिस्थितीत त्यांनी यशाला गवसणी घातलेली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील लोणी हवेली हे त्यांचे मूळ गाव. शेतकरी कुटुंबातील जन्म. कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा. आई-वडील आणि चार भाऊ असं त्यांचे कुटुंब. मध्य प्रदेशात एका कंपनीत वडील नोकरी करत होते. आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र, आपल्या मुलाने शिकून मोठ व्हावे, ही आई-वडिलांची इच्छा होती. सीताराम यांना ही लहानपणापासून शाळेची आवड होती. शिवाय, अभ्यासात हुशार. प्राथमिक शिक्षणानंतर शाळेत जाण्यासाठी जवळपास 12 किलोमीटरचं अंतर दररोज पायी ये-जा करत होते.

बैलगाडीवरून मिरवणूक…
सीताराम कोल्हे हे दहावीच्या बोर्डात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर आई-वडिलांसह गावातील नागरिकांना खूप आनंद झाला. त्यांनी आनंद व्यक्त करत बैलगाडीवरून सीताराम यांची मिरवणूक काढली आणि हाच क्षण त्यांच्यासाठी लाख मोलाचा ठरला होता. या पुढे अजून मेहनत करून काही तरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्या मनात पक्की झाली. पुढे अहमदनगरमध्ये जाऊन अधिक जोमाने पुढील अभ्यास सुरू केला. पुणे विद्यापीठात एमएसस्सीचे शिक्षण घेत असताना पोलिस दलाविषयी अधिक माहिती मिळाली आणि आपण ही पोलिस दलात चांगल्या पदावर भरती व्हायचे म्हणून विचार सुरू केला. त्याच वेळी ग्रामीण भागातील काही मुलं एमपीएसएसीमधून भरती होत होती. त्यामुळे अधिक प्रेरणा मिळाली. दिवसरात्र एक करून अभ्यास केला आणि 1992 साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. तेसुद्धा कोणताही क्लास न लावता. लोणी हवेली गावातील पहिलेच पोलिस अधिकारी झाल्यामुळे नागरिकांनी त्यांच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला होता.

14 रिसर्च पेपर प्रकाशित…
डॉ. सीताराम कोल्हे यांनी नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल्समध्ये 14 रिसर्च पेपर प्रकाशित केले आहेत. दोन वर्षे सातत्याने दक्षता मासिकातून लिखाण केले आहे. विद्यार्थी व पोलिस दलातील नवीन अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान दिली आहेत. शिवाय, तबलावादनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. पोलिस दलामध्ये नोकरी करत असतानाही त्यांनी विविध प्रकारचे छंद जोपासले आहेत. शिवाय, आजही शिकण्याची आवड असून, ऑनलाइन क्लासद्वारे नवनवीन शिक्षण घेत आहेत.

राष्ट्रपतीपदकाने सन्मानित…
पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतीपदकाने त्यांना १५ ऑगस्ट २०२० रोजी सन्मानित करण्यात आले आहे. ७७५ बक्षिसे १२५ प्रशंसापत्रे मिळाली असून पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह तसेच प्रतिष्ठेचा ‘गिरणा गौरव पुरस्कार’ व ‘पंचवटी रत्न पुरस्कार’सुद्धा त्यांना मिळाला आहे. एकूण ३२ वर्षांच्या काळातील चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना पोलिस दलातील सर्वोच्च सन्मानाच्या राष्ट्रपतीपदकाने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. बक्षिसे आणि प्रशंसापत्रांवरून त्यांची कामगिरी पाहायला मिळते.

छंद जोपासले…
डॉ. सीताराम कोल्हे यांनी पोलिस दलात ३२ वर्षे काम करत असताना एक दोन नव्हे तर सहा वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासले आहेत. १) तबला, २) लेखन, ३) गायन, ४) वाचन, ५) अध्यात्म, ६) नाटक हे छंद जोपासल्यामुळे ताणतणाव दूर राहिला आहे. ताणतणाव विरहित जीवन आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आजही त्यांनी जोपासली आहे.

मैत्रीत रमणारा अधिकारी…
डॉ. सीताराम कोल्हे यांची मैत्री जपणारा, खळखळून हसणारा, मैत्रीत रमणारा मित्र म्हणून ओळख आहे. बालपणापासून ते आजपर्यंत अनेक मित्र जोपासले आहेत. विविध वयोगटाचे मित्र आहेत. प्रत्येक वयोगटाचा वेगवेगळा ग्रुप आहे. प्रत्येक ग्रुपला वेळ देत असल्यामुळे मोठा आनंद मिळतो. बालपणीचे मित्र प्रा. संजय दुधाडे आणि कै. पांडुरंग दुधाडे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. पोलिस दलातील मित्रांची यादी तर लांबलचक आहे. पोलिस अधिकारी म्हणून काम करत असताना वेळप्रसंगी अनेकांवर ओरडले आहेत. पण, पोटातून नव्हे तर फक्त गळ्यापासून वर. कोणतेही काम प्रेमाने होते, ओरडून नव्हे. प्रत्येकाच्या जीवनात मित्र-शत्रू असतात. पण, श्री. कोल्हे यांच्या जीवनात लांबची लांब यादी असणारी मित्रांची नावे आहेत.

नाटकातील नव्हे तर खरे पोलिस अधिकारी…
डॉ. सीताराम कोल्हे यांची लहानपणी शरीरयष्टी नाजूक होती. लहानपणी त्यांना एका नाटकामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा रोल पाहिजे होता. पण, नाजूक शरीरयष्टी असल्यामुळे त्यांना तो रोल नाकारण्यात आला आणि खलनायकाचे पात्र दिले. नाटकात त्यांना पोलिस अधिकाऱ्याचे पात्र मिळाले नाही. पण, खऱ्याखुऱ्या आयुष्यात पोलिस अधिकारी झाले आणि अनेकांना न्याय मिळवून दिला. खरंच, आपण पोलिस अधिकारी होऊ, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. पण, एखादी गोष्ट ठरवली आणि मनात आणले तर नक्कीच होते, असा त्यांचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!