
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
किरणकुमार चव्हाण हे गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील पोलिस दलात असल्यामुळे लहानपणापासूनच पोलिस दलाची आवड निर्माण झाली होती. अभ्यासामध्ये उत्तम असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून होमियोपॅथिक डॉक्टर झाले. पोलिस अधिकारी व्हावी, अशी वडिलांची इच्छा असल्यामुळे नियोजनबद्ध स्पर्धा परीक्षाचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात डीवायएसपी परिक्षा उत्तीर्ण झाले. शिवाय, राज्यात प्रथम आले. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर विविध कारवाया केल्या असून, अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. पोलिस दलातील जबरदस्त नियोजनावर भर असलेला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या विषयी थोडक्यात…
किरणकुमार चव्हाण यांचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील नवहाती तांडा हे गाव. वडील पोलिस दलात कार्यरत होते. पोलिस
सहायक निरीक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. किरणकुमार हे लहानपणापासून अभ्यासात उत्तम होते. मुलाने स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस अधिकारी व्हावे, ही वडिलांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेखातर मित्रांसोबत पुणे शहरात जाऊन अभ्यासाला सुरुवात केली. नियोजनबद्ध अभ्यास केला आणि पोलिस अधिकारी पदाला गवसणी घातली.
शिक्षण…
१ ते ४थी – सरस्वती विद्या मंदिर, हिंगोली
५ ते ८वी – जिल्हा परिषद विद्यालय, नर्सी नामदेव, हिंगोली
९ ते १२वी – मानवत, परभणी
बीएचएमएस – भगवान होमिओपॅथिक कॉलेज, संभाजीनगर
पोलिस दलातील कार्यकाळ…
२००७ ते २००८ – प्रशिक्षण, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक
२००८ ते २०११ – कोल्हापूर
२०११ ते २०१४ – बिलोली, नांदेड
२०१४ ते २०१५ – नाशिक पोलिस अॅकॅडमी
२०१५ ते २०१६ – पोलिस उपायुक्त, पोर्ट, मुंबई.
२०१६ ते २०१८ – परिमंडळ – १२, मुंबई
२०१९ ते २०२२ – पोलिस अधीक्षक, फोर्सवन, मुंबई
२०२२ ते २०२४ – पोलिस उपायुक्त, नाशिक
वडील अन् व्यायाम…
किरणकुमार चव्हाण यांचे वडील पोलिस दलात कार्यरत होते. वडिलांमुळे त्यांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड निर्माण झाली होती. अगदी चौथीमध्ये असल्यापासून पहाटेच उठून वडिलांसोबत व्यायामाला घराबाहेर पडत. व्यायामाची आवड आजही जोपासली असून, त्याचा फायदा होताना दिसत आहे. पोलिस कॉलनीत वास्तव्य असल्यामुळे लाइनबॉय म्हणून ओळख होती. लहानपणापासूनच अगदी जवळून पोलिस अधिकारी पाहत आल्यामुळे वर्दीचे आकर्षण होते. मुलाने पोलिस अधिकारी व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. किरणकुमार चव्हाण यांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली आहे.
डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस…
दहावी, बारावीला चांगले गुण मिळाल्यामुळे त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर होमियोपॅथिक डॉक्टर ही पदवी प्राप्त केली. आई-वडिलांना मुलगा डॉक्टर झाल्याचा अभिमान वाटत होता. डॉक्टर म्हणून पुढे अडीच वर्षे नोकरी केली. शिवाय, स्वतःचा दवाखाना सुरू केला. दवाखान्यात सुद्धा प्रॅक्टिस केली. पण, वडील पोलिस दलात असल्यामुळे त्यांना आपला मुलगा पोलिस अधिकारी व्हावा, अशी इच्छा होती. प्रयत्न करावा यश नाही आले तर दवाखाना होताच. यामुळे वडिलांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला दिला.
मित्रांचा ग्रुप अन् पुणे…
वडिलांच्या इच्छेखातर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय झाला. मित्र शंकर पवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. अमोल पोरवाल, राम निवास झंवर, आशिष कापडणे, विकास थोटे, नितीन भुताळे असा मित्रांचा ग्रुप तयार झाला आणि पुणे शहरात जाऊन अभ्यास करण्याचे ठरले. पुणे शहरात दाखल झाल्यानंतर ज्ञान प्रबोधिनीची प्रवेश परीक्षा देण्याचे ठरले. आठ दिवस प्रचंड अभ्यास केला. परंतु, एक गुण कमी पडल्यामुळे प्रवेश मिळू शकला नाही. नंतर वेटिंग लिस्टमध्ये प्रवेश मिळाला. मित्रांनी ग्रुपने अभ्यास करण्याचे ठरवले आणि अभ्यास सुरू केला. राम निवास झंवर यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव असल्यामुळे सर्वांनी त्यांनाच फॉलो करणे सुरू केले. सहा महिन्यांनी स्पर्धा परीक्षा असल्यामुळे कमी कालावधी हातात होता. पण, नियोजन पक्के होते.
राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण…
स्पर्धा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणे तेवढेच महत्त्वाचे होते. तीन महिन्यांचा कालावधी हातामध्ये होता. संभाजीनगर येथे येऊन अकाऊंटचे शिक्षक अझर इमाम यांच्याकडे क्लास लावला. अकाउंट्स विषयाचा अभ्यास सुरू केला आणि पुन्हा नियोजनावर भर दिला. मिनिटा-मिनिटांचे नियोजन केले आणि सरावाला सुरुवात केली. सर्वांपेक्षा वेगळे उत्तर असले पाहिजे आणि न घाबरता तोंडी परीक्षेला सामोरे जाण्याचे ठरवले. मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांना धडाधड उत्तरे दिली. नियोजनबद्ध केवळ सहा महिनेच अभ्यास करून दोन्ही परीक्षा दिल्या आणि निकाल हाती आला. राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. आई-वडिलांसह त्यांना मोठा आनंद झाला होता. वडिलांचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात साकार केले होते. विशेष म्हणजे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मोबाईलचा अत्यल्प वापर केला.
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…