नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….

नाशिक : नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील सुराणा ज्वेलर्सवर प्राप्तिकर विभागाने धाड टाकून ३० तास शोध मोहिम राबविली. यानंतर ज्वेलर्समधून तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ९० कोटींच्या संपत्तीचे कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. नागपूर आणि जळगावमधील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली आहे. जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तासांचा वेळ लागला.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात प्राप्तिकर विभागाकडून कारवाई होत आहेत. काही दिवसांपूर्वी नांदेडमधील संजय भंडारी नावाच्या व्यावसायिकावर अशाचप्रकारे कारवाई करत १७० कोटींची बेहिशोबी मालमत्तेवर टाच आणली होती. तर धाडीत १४ कोटींची रोकड आणि ८ किलो दागिने जप्त केले होते. त्यानंतर नाशिकमध्ये मोठी कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्तिकर विभागाने शनिवारी (ता. २५) सकाळी कारवाई करण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानावर धाड टाकली. अधिकाऱ्यांच्या पथकाने दिवसभर आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र, घेवाण-देवाण संबंधी व्यवहार त्याचे दस्ताऐवज तपासले. सलग ३० तास ही कारवाई सुरू होती. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स आणि त्यांच्याशी संबंधित रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयातही धाड टाकली. तसेच नाशिकच्या राका कॉलनीमध्ये असलेल्या बंगल्यावरही स्वतंत्र पथकाकडून शोधमोहीम राबविली गेली. सुराणा यांच्या बांधकाम व्यवसायिकांशी संबंध असल्याचे देखील माहिती आयकरच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर केलेला झाडाझडतीत तब्बल 26 कोटी रुपये कॅश, तर 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तांचे दस्तऐवज पथकाच्या हाती लागले.

आयकर विभागाची नाशिक शहरातील कारवाई सुरू झाल्यानंतर सुराणा यांच्या कार्यालयात देखील आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आणि त्या ठिकाणी कागदपत्रांची देखील तपासणी केली. एकाच ठिकाणी आयकर विभागाच्या वेगवेगळ्या पथकाने धाडसत्र सुरू केले. जवळपास 30 तास ही तपासणी सुरू होती आणि या तपासणी दरम्यान फर्निचरच्या प्लाऊडमध्ये अधिकाऱ्यांना नोटांची भिंत आढळून आली. यावेळी एकूण 26 कोटी रुपयांची रोकड असल्याची माहिती मिळाली. तर, दुकान आणि कार्यालयात एकूण 90 कोटींचे बेहीशेबी मालमत्तेचे दस्तऐवज देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले.

आयकर विभागाने सुराणा यांच्या दुकानात आणि कार्यालयात एकाच वेळी छापा सत्र सुरू केले. तपास सुरू केला असता यावेळी रियल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयातही एक पथक दाखल झाले होते. त्यानंतर नाशिक शहरातील राका कॉलनी या ठिकाणी असलेल्या सुराणा यांच्या आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात आणि खाजगी लॉकर्स, बँकांमधील लॉकर्समध्ये देखील तपासणी आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनी केली.

मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी ही देखील तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तांचे दस्तऐवज पथकाने जप्त केले आहे. या कारवाईमध्ये मालमत्तांचे दस्तऐवज असलेले हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह देखील या पथकाच्या शोधकार्यात मिळून आले आहेत. कारवाईनंतर नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड; घबाड हाती…

शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात मिळालं घबाड…

लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…

पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच दिसलं मोठं घबाड…

रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!