
जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…
जळगाव: सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती कळताच जमावाने पोलिस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांच्याकडे केली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच जमाव प्रक्षुब्ध झाला आणि जामनेर पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. या घटनेत मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
जामनेरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे. जामनेरमध्ये दगड आणि जाळपोळ झाल्याच्या घटनेनंतर जखमी पोलिसांना जळगाव मधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रुग्णालय जाऊन जखमी पोलिस कर्मचाऱ्यांशी विचारपूस केली.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या करण्यात आलेल्या आरोपीला अटक केल्यानंतर ही काही समाजकंटकांनी कायदा हातात घेत पोलिसांवर दगडफेक केली, तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेज तपासून या सर्व जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतल्याची माहिती जळगावचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.
गुरुवारी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ही घडली. काही दिवसांपूर्वी जामनेर पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले होते. काल रात्री बेकायदेशीर जमाव पोलिस ठाण्याबाहेर जमला होता. आम्ही याप्रकरणात योग्य ती कारवाई करु, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन पोलिसांनी जमावाला केले. मात्र, जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. यामध्ये पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. आम्ही दगडफेक करणाऱ्या प्रत्येकाला ताब्यात घेऊ, असेही अशोक नखाते यांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार अन् बनवला Video…
पुणे जिल्हा हादरला! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन, दारू पाजली अन् लॉजवर अत्याचार…
धक्कादायक! चुलत्याने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म…
अहमदनगर जिल्ह्यात वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार…
संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

