आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…

आळंदी (पुणे): आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका बारा वर्षीय मुलावर महाराजाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आळंदी पोलिसांनी वारकरी संस्थेतील महाराजाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

माडनूर मधील आळंदीत एक अन्नदान संस्था आहे. या संस्थेमध्ये बारा वर्षाचा अल्पवयीन मुलगा वारकरी शिक्षण घेत आहे. शनिवारी (ता. १७) पहाटे झोपलेल्या अवस्थेत असताना मुलाला महाराजाने त्याला उचलून टीव्ही असणाऱ्या खोलीत नेले. तसेच त्याला मोबाईल खेळायला देत त्याच्यावर अनैसर्गिक रित्या बलात्कार केला. याला मुलाने विरोध केला तरी देखील महाराजानी ऐकले नाही. आणि त्याला गप्प करत शांतपणे सर्व सहन करावे लागले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर व्यकंटेश काशिनाथ माडनूर या महाराजाला अटक केली आहे. महाराजावर बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.

धक्कादायक! नाशिकमध्ये चिमुकल्याचे अपहरण अन् अत्याचार करून हत्या…

डॉक्टर बलात्कार आणि हत्या! पोलिसांच्या तीक्ष्ण नजर अन् आरोपीचे फुटलं बिंग…

सोलापूर हादरलं! मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन अन् त्याच्या पत्नीवर बलात्कार…

संतापजनक! सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीवर पुन्हा बलात्कार अन्…

संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…

संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!