पुणे शहरात भोंदूबाबाने महिलेला फसवलं; सोन्याच्या हंड्यात निघाली माती…

पुणे: पुणे शहरातील कोथरुड येथील महिलेला सोन्याचा हांड्याचं आमिष दाखवत जादुटोणा करुन कोरेगाव पार्कमधील भोंदूबाबाने 2 लाख रूपयांना फसवल्याची घटना समोर आली आहे. भोंदूबाबाने दिलेल्या सोन्याच्या हंड्यात 15 दिवसांनी माती निघाली, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी महंमद खानसाहेब जान मदारी नावाच्या भोंदूबाबाला याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कोरेगाव पार्क परिसरात सोन्याचा हंडा मिळविण्यासाठी जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला कोरेगाव पार्क पोलिसांनी ठोकल्या आहेत. महंमद खानसाहेब जान मदारी (रा. कोरेगाव पार्क, पुणे) असे बेड्या ठोकण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूडमध्ये राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

कोथरूड भागात राहणारी महिला आणि त्यांची एक मैत्रीण गेल्या वर्षापासून भोंदूबाबा मदारी याच्याकडे जात होती. तिच्याकडूनच महिलेला या बाबाबद्दल माहिती मिळाली. तक्रारदार महिला विधवा असून तिला दोन मुले आहेत. घरची आर्थिक चणचण दूर व्हावी, असे तिला वाटत होते. ही बाब तिने बाबासमोर बोलून दाखविल्यानंतर मदारी याने तिला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा हंडा मिळवून देतो, असे सांगितल्यानंतर त्याने तिला पूजेचा घाट घालावा लागेल, असे सांगून तिच्याकडून दोन लाख 60 हजार रुपये घेतले.

पंधरा दिवसांपूर्वी त्याने आपल्या घरी पूजा मांडून तिला एक मातीचे मडके व त्यावर काळ्या रंगाचे कापड बांधून दिले. तसेच, ते कापड 17 दिवसांनी रात्री 11 वाजून 21 मिनिटांनी उघडण्यास सांगितले. हंडा उघडल्यानंतर माती निघाली. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे जाणवताच पोलिसांनी सापळा लावून मदारीला ताब्यात घेतले आहे. महंमद खानसाहेब जान मदारी (वय 65 वर्ष, रा. मदारी वस्ती, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार; तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, 2013 मधील कलम 3 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे तपास पथक करीत आहे. पोलिसांनी नागरिकांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…

पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…

पुणे! भोंदूबाबा निघाला समलैंगिक; पाहा पराक्रम…

पुणे! मोबाईल गरम झाला अन् भोंदूबाबाचं भलतंच कांड झालं उघड…

भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…

धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा…

भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…

भोंदूबाबा व्यापाऱ्याला बंद खोलीत घेऊन गेले अन् शुद्धीवर आल्यावर बसला धक्का…

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

भोंदूबाबाच्या खोलीच्या आत खोली; महिलांना तिथे बोलवायचा अन्…

पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!