
वाघोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरात गावठी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य टोळीचा वाघोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दोन दुचाकी असा एकूण चार लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने ही कारवाई केली.
View this post on Instagram
पोलिस हवालदार प्रदीप मोटे यांना १६ नोव्हेंबर २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोवा येथून दोन इसम केटीएम मोटारसायकल क्रमांक GA03AN0434 वरून वाघोली परिसरात येणार असून, ते रेकॉर्डवरील आरोपी आकाश मोरे याच्याकडून पिस्तूल खरेदी करणार आहेत. या माहितीची खात्री करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक शिवशंकर राघू आणि पोलिस हवालदार प्रदीप मोटे यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली. पथकातील कर्मचाऱ्यांनी वाघोली परिसरात सापळा रचला.
दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी आकाश मोरे हा पिस्तुलांची विक्री करत असताना त्याच्यासह गोवा राज्यातून पिस्तूल खरेदी करण्यासाठी आलेले दोन आरोपी आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार गावठी बनावटीची पिस्तुले, चार मॅगझिन, एक रिकामे मॅगझिन, १५ जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दोन दुचाकी असा एकूण चार लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे शहरात अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. या शस्त्रांचा वापर कोणत्या गुन्ह्यांसाठी होणार होता, तसेच या टोळीचे आणखी कोणाशी संबंध आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.
संबंधित कारवाई वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार गायकवाड, वरीष्ठ पोलिस निरीक्षक वाघोली पोलिस ठाणे पुणे शहर, पल्लवी मेहेर पोलिस निरीक्षक गुन्हे वाघोली पो स्टे पुणे शहर, मा.मंगेश जगताप पोलिस निरीक्षक गुन्हे वाघोली पो स्टे पुणे शहर, पोउपनि / शिवशंकर राघु, सपोफौ बाळासाहेब मोराळे, पोहवा /६६१६ प्रदिप मोटे, पो.अं.८६६६ अमोल सरतापे, पो. अं. / ८७०७ मारुती वाघमारे, पो. अं. / १०४३७ महादेव कुंभार, पो. अं. / १०५४८ अशोक शेळके, पो.अं/१०५८० समीर भोरडे, पो. अं. / १०५९४ पांडुरंग माने, पो. अं. / १०६४२ गहिनीनाथ बोयणे, पो. अं/२६८८ ऋषीकेश व्यवहारे, पो.अं./१०७१७ योगेश शिंदे, पो.अं./२४२२ राहुल गोरे, पो. अं. / २६०८ विशाल गायकवाड, पो.अं/२७७८ अमोल घावटे यांनी केली आहे.
पुणे! वाघोली पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रसाठी बाळगणाऱ्यास केली अटक…
पुणे! वाघोली परसिरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मित्राकडूनच खून…
वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी…
लोणीकंद व वाघोली परिसरातील डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळी जेरबंद…
वाघोलीत मुली सोबत बोलतो म्हणून अल्पवयीन मुलाची केली हत्या…

