पुणे! जेसीबी मालकाने मजुरांना तोंड उघडल्यास गंभीर परिणामाची दिली धमकी अन् पोलिसांनी…

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथील एक खळबळजन प्रकार यवत पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. एका मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर, हा गुन्हा दडपण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह कारमधून नेऊन वाघोली-राहू रस्त्यावर फेकून दिला. मात्र पोलिसांच्या चौकशीत कट उघड झाला असून, पोलिसांनी गुऱ्हाळ मालक, जेसीबी चालक आणि मालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रामू शंभू पासी (वय २३, मूळ रा. कोला, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) हा युवक एप्रिल २०२६ पासून खामगाव येथील ‘गाडीमोड’ परिसरातील एका गुऱ्हाळावर मजूर म्हणून काम करत होता. १९ जूनच्या मध्यरात्री गुऱ्हाळावर जेसीबीचे काम सुरू होते. यावेळी चालक आलम याने निष्काळजीपणाने जेसीबी चालवला, ज्यामुळे तिथे झोपलेल्या रामू पासीच्या अंगावरून थेट जेसीबी गेला. या भीषण दुर्घटनेत रामूचा जागीच मृत्यू झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

अपघातानंतर पोलिसांना कळवण्याऐवजी आरोपींनी गुन्हा लपवण्याचा कट रचला. जेसीबी मालकाने गुऱ्हाळावरील इतर मजुरांना तोंड उघडल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपींनी संगनमत करून रामूचा मृतदेह एका कारच्या डिकीत ठेवला. पहाटेच्या सुमारास त्यांनी हा मृतदेह वाघोली-राहू रस्त्यावर नेऊन टाकला, जेणेकरून त्याचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे असे दाखवता येईल.

रामू अचानक गायब झाल्याचे कंत्राटदार तमेरेज फरीदी यांनी त्याच्या उत्तर प्रदेशातील कुटुंबीयांना फोन करून सांगितले. त्यानंतर रामूचा भाऊ राजू पासी तातडीने दौंडमध्ये दाखल झाला. दोन दिवस त्याने भावाचा सर्वत्र शोध घेतला. २१ जून रोजी जेव्हा तो गुऱ्हाळावर चौकशीसाठी गेला, तेव्हा तिथल्या लोकांच्या वागण्यावरून त्याला संशय आला. राजूने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. यवत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करताच हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, या प्रकरणी मृत मजुराचा भाऊ राजू पासी याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जेसीबी मालक अविनाश बाळासाहेब यादव, गणेश हरिभाऊ जगताप, कल्लू ऊर्फ प्रधान इस्तकार आणि चालक आलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची माहिती पोलिसांपासून दडवून ठेवल्याप्रकरणी गुऱ्हाळ मालक नाथाजी कोळपे याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video : पुणे पोलिस दलातील PSI संदीप कदम यांचे निलंबन…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…

पुणे जिल्ह्यात युवतीला ढकललं कालव्यात अन् 18 तासांनंतर…

नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी बातमी! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!