
मुंबईत Live कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस, युवक-युवतीचा मृत्यू…
मुंबई: मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन कॉलेज विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलातील हॉल क्रमांक ४ मध्ये ११ एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे ६ वाजता या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टला सुरुवात झाली होती. या कार्यक्रमासाठी तब्बल तीन ते चार हजार युवक-युवतींनी गर्दी केली होती. कार्यक्रमानंतर अधिकृत आफ्टर पार्टीही आयोजित करण्यात आली होती आणि ही पार्टी पहाटेपर्यंत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
या कॉन्सर्टसाठी विविध प्रकारचे एंट्री पॅकेज आणि तिकीट श्रेणी ठेवण्यात आल्या होत्या. १४९९ रुपयांपासून ते तब्बल १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ठेवण्यात आले होते. कॉन्सर्टदरम्यान काही जणांनी मोठ्या प्रमाणात मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन केल्याची माहिती समोर येत आहे. ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्यामुळे काही जणांची प्रकृती अचानक बिघडली. यामध्ये एका नामांकित कॉलेजमधील एक युवक आणि एका युवतीचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही मृत तरुण-तरुणी एमबीएचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कॉन्सर्टदरम्यान ड्रग्ज कसे पोहोचले आणि त्यामागे कोणाचे नेटवर्क आहे याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी व्हायरल; अधिकाऱ्याने दिले शूज…
महाराष्ट्रात बेरोजगारी! MBA, MCA झालेले उच्चशिक्षित युवक पोलिस भरतीसाठी…
जळगाव! लव्ह ट्रँगलमधून युवकाची हत्या; पोलिसाने पाहिले अन् जागेवरच पकडले…
पुणे! आयटी क्षेत्रातील युवक-युवतीला पकडणारे तिघं पोलिस निलंबित…

