
लग्नानंतर कष्ट करून पत्नीला पोलिस बनवलं अन् नोकरी मिळताच ठोकली प्रियकरासोबत धूम…
पाटणा (बिहार) : पतीनं लग्नानंतर कष्ट करून पत्नीला शिकवलं. परिक्षा देऊन पोलिस बनवलं अन् नोकरी मिळताच पत्नीने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना रोहतास जिल्ह्यात घडली आहे. या घटनेची पसिरात जोरदार चर्चा आहे.
डेहरी येथील डालमियानगरमध्ये राहणाऱ्या अजय सिंह यांचा विवाह २६ जानेवारी २०२५ रोजी रोहतास येथील दरिहट भागातील अर्चना हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर अर्चना यांनी शासकीय नोकरी करण्याची आणि त्यासाठी तयारी करण्याची इच्छा पतीकडे व्यक्त केली. पतीनेही तिच्या इच्छेला पूर्ण पाठिंबा दिला. नगर परिषदेमध्ये खासगी काम करत अजय यांनी पत्नीला शिक्षणासाठी मदत केली. अर्चना परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. दरभंगामध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आणि बिहार पोलिसात ‘कॉन्स्टेबल’ म्हणून त्यांची निवड झाली. सध्या त्यांची नियुक्ती बेगूसराय येथील BSAP मध्ये होती. सरकारी नोकरी मिळाल्यामुळे आता घराची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आयुष्य आनंदाने जाईल, अशी आशा अजय आणि त्यांच्या कुटुंबाला होती.
View this post on Instagram
पती अजय यांच्या आरोपानुसार, कॉन्स्टेबल पदावर नोकरी लागल्यानंतर अर्चना यांचे वर्तन बदलू लागले. दोघांमधील अंतर वाढत गेले. दरम्यानच्या काळात अर्चना दोनदा गरोदर राहिल्या होत्या, मात्र दोन्ही वेळा त्यांचा गर्भपात झाला. जुलै महिन्यात अर्चना सुट्टी काढून सासरी आल्या होत्या. याचदरम्यान अजय यांनी अर्चना यांच्या मोबाईलमध्ये ‘विवेक’ नावाच्या युवकासोबत झालेली व्हॉट्सॲप चॅट पाहिली. या चॅटवरून संशय आल्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादानंतर अर्चना घरातून निघून गेल्या. त्या प्रियकर विवेक याच्यासोबतच पळून गेल्याचा थेट आरोप पतीने केला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी पती अजय यांनी डालमियानगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून रोहतासच्या पोलिस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी लावली आहे. दुसरीकडे, मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी मिळताच अर्चना यांची आई शकुंतला देवी यांनीही रोहतास एसपी यांची भेट घेऊन मुलीचा शोध घेण्याची विनंती केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रेम, लग्न आणि पत्नीचे उच्च शिक्षण; पत्नी म्हणते कोण तो? ओळखत नाही…
हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
75 वर्षांच्या आजोबांचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; हनिमूनच्या रात्रीच मृत्यू…
डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं…

