
पाप करणाऱ्यांना फाशी, भीती निर्माण करणे गरजेचे: नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पाप करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होते आणि ही भीती निर्माण करणे खूप गरजेचे आहे. लेकींवर अत्याचार होत आहेत. आपल्याला गांभीर्याने विचार करायला हवा. महिलांविरोधात गुन्हा करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा होईल, असा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे.
भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन आज (गुरुवार) देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान म्हणून मोदींनी ११व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. देशवासियांच्या नावाने संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विकसित भारत २०४७ या मुद्द्यावर जोर दिला. भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचे स्मरण केले. आज शुभवेळ आहे, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. भारत मातेच्या असंख्य वीर पुत्रांचे स्मरण कऱण्याचा हा दिवस असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातील घटनेवरही त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्ष भाष्य केले. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटले की, पाप करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होते आणि ही भीती निर्माण करणे खूप गरजेचे आहे. लेकींवर अत्याचार होत आहेत. आपल्याला गांभीर्याने विचार करायला हवा. महिलांविरोधात गुन्हा करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा होईल असा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.
लाल किल्ल्यावरून बोलताना मोदी म्हणाले, प्रत्येक विभागात महिलांचा सहभाग दिसत आहे. पण दुसऱ्या बाजूला चिंताजनक गोष्टीही होत आहेत. आज लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा पीडा व्यक्त करायचीय. एक समाज म्हणून गांभीर्याने विचार करावा लागेल की आपल्या आई, बहिणी आणि लेकींवर जो अत्याचार होत आहे त्याबद्दल देशात आक्रोश आहे. हा आक्रोश दिसून येत आहे. यामुळे देशाला, समाजाला आणि राज्य सरकारांनासुद्धा हे गांभीर्याने घ्यावे लागेल. महिलांवर अत्याचाराची लवकरात लवकर चौकशी व्हावी, राक्षसी कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी हे गरजेचे आहे.’
Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…
डॉक्टर बलात्कार आणि हत्या! पोलिसांच्या तीक्ष्ण नजर अन् आरोपीचे फुटलं बिंग…
धक्कादायक! पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा गेला जीव…
नितेश राणे यांनी भर सभेत दिली थेट पोलिसांना धमकी; म्हणाले…
ऑनर किलिंग! वडील मलाही संपवतील; विद्याचा मन सुन्न करणारा आर्त टाहो…

