धक्कादायक Video: बापाने लेकीसमोरच तिच्या मित्रावर केले सपासप वार…

अहमदाबाद (गुजरात): एका इन्स्टिट्यूटमध्ये मुलीच्या बापाने तिच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मुलीशी बोलत असल्याच्या रागातून मुलीच्या बापाने ट्यूशनमधील एका विद्यार्थ्यावर पाच सेकंदात चाकूने सपासप सहा वार केले आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुलीच्या बापाने केलेल्या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या मांडीवर आणि पाठीवर खोल घाव झाले आहेत. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील ओझ इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली आहे. कार्तिक असे हल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर अटक केलेल्या आरोपीचे नाव जगदीश रचाड आहे. जखमी कार्तिक आणि आरोपी जगदीश रचाड याची मुलगी एकाच ट्यूशनमध्ये शिकायला आहेत. कार्तिकची आरोपीच्या मुलीसोबत जवळीक वाढली होता. तो संबंधित मुलीशी फोनवरून बोलत होता. ही बाब मुलीचे वडील जगदीश रचाड याला समजली. यामुळे जगदीश रचाड रागावले. त्याने शाळेत येऊन याबाबत तक्रार केली. हा प्रकार समजल्यानंतर शिक्षकांनी मुलीसह तिच्या वडिलाला आणि संबंधित मुलाला समुपदेश करण्यासाठी एका रुममध्ये बोलावले. याठिकाणी शिक्षक देखील उपस्थित होते. दोन्ही मुलांचे समुपदेशन सुरू असताना मुलीच्या वडिलांनी अचानक खिशातून चाकू काढला आणि मुलाच्या मांडीवर पाठीवर सपासप वार करायला सुरुवात केली. समुपदेशन सुरू असताना अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुलगा स्वत:चा बचाव करू शकला नाही. आरोपीने अवघ्या पाच सेकंदात सहा वार करत मुलाला रक्तबंबाळ केले.

शिक्षकाने घाबरून मुलीच्या वडिलांसमोर हात जोडले. तर मुलगी देखील घाबरली. या सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यानंतर संस्थेत गोंधळ उडाला आणि जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी बापाला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका…

मुंबईत मैत्रीच्या ओळखीचा गैरफायदा! सामूहिक बलात्कार…

Video Call वर महिलेशी मैत्री; रोमॅन्टिक गोष्टी अन् पुढे…

मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…

Video: महिला प्राध्यापिकेने वर्गातचं केलं विद्यार्थ्याशी लग्न…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!