
पुणे ग्रामीण पोलिस दलातील निखिल रणदिवे बेपत्ता होण्याचे कारण समोर…
पुणे: पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी धक्कादायक स्टेटस ठेवून ते बेपत्ता झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बदली होऊन देखील पोलिस अधिकाऱ्यांनी सोडले नसल्याने पोलिस हवालदार मानसिक तणावात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पुणे ग्रामीण पोलिस दलातील नाईक हवालदार निखिल रणदिवे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळे व्हाट्सएपवर स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत मुलीच्या वाढदिवसाला भावनिक पोस्ट करून बेपत्ता झाले. पोलिसांकडून शोध सुरू आहे. यवत ते शिक्रापूर दरम्यान निखिल रणदिवे यांची बदली झाली होती. मात्र त्यांना पोलिस निरीक्षक यांनी सोडले नाही त्यामुळे मानसिक त्रासामध्ये होते.

दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशनमध्ये हवालदार पदावर निखील रणदिवे कार्यरत होते. त्यांनी यवत स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. यवत पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या केडगाव येथील पोलिस चौकीमध्ये निखिल रणदिवे हे पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. मागील वर्षभरापासून त्यांची बदली झाली नव्हती, त्यामुळे ते त्रस्त होते. तसा उल्लेख त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटमध्ये केला आहे.
निखिल रणदिवे यांची मागील काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे बदली झाली होती. पण यवत पोलिस स्टेशनमधून रणदिवे यांना सोडण्यात आले नव्हते. रणदिवे यांनी आपल्या कुटुंबाला शिक्रापूर येथे शिफ्ट केले होते. पण स्टेशनवरून सोडण्यात येत नसल्यामुळे रणदिवे तणावाखाली होते. ५ डिसेंबर रोजी रणदिवे यांनी व्हॉट्सअपवर एक पोस्ट लिहिली. यात यवत पोलिस स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख हेच मागील १ वर्षांपासून सतत त्रास देत आहेत. माझ्या नाईलाज आहे. मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेत आहे. अशी पोस्ट टाकून रणदिवे बेपत्ता झाले आहे. रणदिवे हे स्टेटस ठेवल्यापासून त्यांचा मोबाईल बंद असून ते अद्यापपर्यंत मिळून आला नाही. यामुळे पुणे जिल्ह्याच्या पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लाखो रुपयांची लाच पडली महागात; PSI प्रमोद चिंतामणी अखेर बडतर्फ…
पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ! इंदापूरचा पोलिस कर्मचारी चिठ्ठी लिहून बेपत्ता…
पुणे पोलिस दलात खळबळ! वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल…
पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…
पोलिसकाकाच्या पत्राने पोलिस दलात उडाली खळबळ…

