
कोल्हापूर! नवऱ्याने मध्यरात्री आवळला पत्नीचा गळा; पैसे कोणाला देतेस…
कोल्हापूर: कोल्हापुरच्या महालक्ष्मीनगर परिसरातील एका व्यक्तीने मध्यरात्री उशिरा पत्नीचा गळा आवळला. पत्नी पूर्णपणे मेली नसल्याचा संशय आल्याने त्याने चाकूने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आरोपीने स्वत: पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
परशराम पांडुरंग पाटील (वय ४४) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अस्मिता परशराम पाटील (वय ४२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. कर्जाच्या पैशांवरून झालेल्या वादानंतर ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबतची कबुली आरोपीनं स्वत: पोलिसांकडे दिली आहे. करवीर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
अस्मिता पाटील शिवणकाम करत होत्या, तर त्यांचे पती परशराम हा उद्यमनगरात एका फाउंड्रीमध्ये कामाला आहे. मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर पती-पत्नीमध्ये पैशांवरून वाद सुरू झाला. परशराम यांनी अस्मिता यांना विचारले, “लाखो रुपयांचे कर्ज आणि व्याजाने घेतलेले पैसे तू कुठे खर्च करतेस?” यावरून वाद वाढत गेला. रागाच्या भरात परशरामने पत्नीचा गळा दाबला. मात्र, ती पूर्णपणे मृत झाली नाही असे वाटल्याने त्याने चाकूने तिचा गळा चिरला. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अस्मिता यांना पाहून काही वेळाने मुलं आलोक आणि पार्थ घरी आले. त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण आतून कडी लावलेली होती. काही वेळाने परशराम पाटील यांनी स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी दरवाजा उघडला आणि पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अस्मिता पाटील यांनी काही वर्षांपूर्वी सुमारे २० लाखांचे कर्ज घेतले होते, जे फेडण्यासाठी परशराम यांना कळंबा येथील स्वतःचे घर विकावे लागले. त्यानंतर पाटील कुटुंब गेल्या ५ वर्षांपासून महालक्ष्मीनगरात भाड्याच्या घरात राहत होते. भाड्याचा खर्च परवडत नसल्यामुळे अस्मिता यांनी आपले शिवणकामाचे दुकानही बंद केले होते. काही महिन्यांपूर्वी, अस्मिता यांनी पुन्हा मुले आलोक (वय २२) आणि पार्थ (वय २०) यांच्या नावावर प्रत्येकी एक लाखाचे कर्ज एका फायनान्स कंपनीकडून घेतले होते. मात्र, ही गोष्ट त्यांनी पती परशराम यांना सांगितली नव्हती आणि मुलांनाही वडिलांना याबद्दल काही न सांगण्याची ताकीद दिली होती.
परशराम यांना या कर्जाबद्दल समजले, तेव्हा त्यांना राग आला. आधीच कर्जापायी घर विकण्याची वेळ आल्यामुळे संतापलेल्या परशरामने अस्मिता यांना जाब विचारला. “तू वारंवार कर्ज का काढतेस आणि हे पैसे कोणाला देतेस?” असे त्यांनी विचारले, पण अस्मिता यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. या सततच्या वादामुळे परशराम यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले…
सैराट! वडिलांच्या दाव्यामुळे आता या प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे! प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले; रोहिणी खडसे म्हणाल्या…
कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…
कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

