
हृदयद्रावक! क्रेनला बांधलेला तुटला दोर अन् युवकाचे पाय झाले धडावेगळे…
मुंबई: घाटकोपर येथील रमाबाई ब्रीजवर एका दुचाकीवर क्रेन उलटून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचे पाय धडापासून वेगळे झाले आहेत. दुचाकी स्वाराची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताच्या घटनेनंतर घाटकोपर ब्रीज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
अपघातग्रस्त क्रेन एका ट्रेलरवर लोड केला होता आणि हा ट्रेलर अलिबागवरून भांडूपच्या दिशेने जात होता. दरम्यान, हा ट्रेलर रमाबाई ब्रीज परिसरात आल्यानंतर अपघात झाला. ब्रीज उतरत असताना क्रेनला बांधलेला दोर तुटला आणि क्रेन रस्त्यावर उलटला. यावेळी एक युवक आपल्या दुचाकीवरून जात होता. हा क्रेन दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीचा चुराडा झाला आहे. युवकाचे पाय धडापासून वेगळे झाले आहेत. युवकाला तत्काळ सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. घाटकोपर ब्रीज मागच्या सहा तासांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून होणारी वाहतूक सर्व्हिस रोडने वळवण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हिट अँड रन! दुचाकाली जोरात धडक; दोन चुलत भावांसह मित्राचा जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! विद्यार्थ्याने पेपर लिहिता लिहिताच घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक! बंगळुरुच्या इंजिनिअरनं मृत्यूपूर्वी दिलं बाळाला गिफ्ट; सांगितलं 2038 मध्ये उघड…
सांगलीत दुचाकी अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…
कु्र्ला बस अपघातातील बस चालक मोरेची पत्नी आणि मुलाने सांगितले की…

