घराशेजारी राहणाऱ्या महिलेसाठी बनली पुरुष अन् फसवलं…

मुंबई : मुंबईमध्ये एका शेजारी राहणाऱ्या महिलेला शेजारणीने पुरुषी आवाज काढून तिला आपल्या जाळ्यात ओढून फसवल्याची धक्कादायक घटना काशिमिरामधील पृथ्वी प्राईट या उच्चभ्रू सोसायटीती घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे.

ॲनी धैर्यमानी राहात असलेल्या इमारतीमध्ये रश्मी सजलकर राहात आहे. ॲनीच्या पतीचे निधन झाले असून, ती कामाच्या शोधात होती. याची माहिती रश्मीला होती. रश्मी आणि तिच्या पतीने ॲनीला लुटण्याचा कट रचला. एके दिवशी बोलता बोलता रश्मीने ॲनीला एका मोठ्या कंपनीत 43 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजमध्ये नोकरी देण्याचे वचन दिले. अभिमन्यू नावाच्या व्यक्तीचा फोन नंबर तिला दिला. ॲनीने अभिमन्यूला फोन केला आणि कामाबाबत विचारले. तेव्हा त्याने तिला लवकरात लवकर एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

ॲनी आणि अभिमन्यूचे अनेकदा फोनवर बोलणे सुरू झाले. अभिमन्यूने तिच्याशी लग्नाच्या बहाण्याने पैसे उकळायला सुरुवात केली. काही महिन्यांतच तिने त्याला 6 लाखांपेक्षा अधिक पैसे दिले. पण काही काळाने ॲनीला संशय आला. तिने चौकशी केली तेव्हा त्याला कळले की त्याच्याशी फोनवर बोलणारी व्यक्ती ही अभिमन्युन ही दुसरी कोणी नसून शेजारी राहणारी रश्मी सजल होती, जी तिला सहानुभूती दाखवून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत होती.

ॲनीने त्यानंतर काशिगाव पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. 26 जून रोजी काशीगाव येथे रश्मी आणि तिचा पती सजलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपी रश्मी सजलकर हिला अटक केली. तर तिचा नवरा अद्याप फरार आहे, अशी माहिती डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…

युवती मुलाप्रमाणे वावरायची हे आई आणि भावाला खटकले अन्…

धक्कादायक! मानलेला भाऊ निघाला प्रियकर अन् त्याने…

सासूने समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी सुनेवर केली जबरदस्ती अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!