कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची कारागृहात आत्महत्या…

मुंबई: कल्याणमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी विशाल गवळी याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तळोजा कारागृहात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास त्याने शौचालयात जाऊन गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

विशाल गवळी याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून स्वत:च्या घरी आणले होते. घरात त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून त्याने पीडित मुलीची हत्या केली होती. त्यानंतर विशाल गवळी याने या मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. त्यानंतर विशाल गवळी हा शेगावला पळून गेला होता. शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलूनमधून त्याला ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर कल्याण परिसरात संतप्त पडसाद उमटले होते.

विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता. त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होती. कल्याण पूर्व परिसरात त्याच्या दहशतीमुळे अनेक कुटुंब हा परिसर सोडून गेली होती. मात्र, विशाल गवळी याला राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्याविरोधात कठोर कारवाई होत नव्हती.

विशाल गवली याची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला होती. विशाल गवळीने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी पत्नीने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती. या दोघांनी एका रिक्षातून मृतदेह भिवंडीजवळील बापगाव परिसरात दोघांनी मिळून फेकून दिला होता.

संतापजनक Video: सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिकवल्या अश्लील शिव्या…

पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला घेतला गळफास…

Video: पोलिसाला हेल्मेट घालण्यास सांगितलेल्या युवकाला पोलिसाने मारली चापट…

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!