
दीराने वहिनीच्या बहिणींना पाठवले नको ते मेसेज अन् पुढे तर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका दीराने वहिनीच्या बहिणींना मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांची छेड काढत होता. त्याच्या भीतीने आधी त्याच्या दोन्ही मुलींनी कॉलेजला जाणे सोडले होते. तरीही त्याचा त्रास सुरू होता. यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवाबगंजमधील एका व्यक्तीने त्याच्या मोठ्या मुलीच्या दीरावर गंभीर आरोप करून गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीने सांगितले, ‘मोठ्या मुलीचा दीर त्याच्या दोन छोट्या मुलींची छेड काढतो. आपल्या दोन्ही मुलींना त्याच्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी त्यांच्या मामाकडे पाठवले. मात्र आरोपी तिथेही गेला आणि मुलींना त्रास देऊ लागला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच नोएडाला स्थलांतरित झाले. एवढं झाल्यावरही मोठ्या मुलीचा दीर त्यांना तिथेही जाऊन धमकावत आहे, घाबरवत आहे. अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.’
क्योलडिया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या दोन मुली कॉलेजमध्ये शिकत होत्या. मोठ्या मुलीचा दीर त्याच्या छोट्या मुलींची कॉलेजात येता-जाताना छेड काढत होता. दोन्ही मुलींनी आरोपीच्या भावाकडे आणि त्याच्या वडिलांकडे केली. तरीही आरोपीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्याच्या त्रासाला कंटाळून मामाकडे राहायला गेलो. तेथेही तो त्रास देत होता. अखेर, नोएडात स्थलांतरित झालो. तो नोएडात येऊनही मुलींना त्रास देऊ लागला. त्याच्या भीतीने माझ्या दोन मुलींनी शिक्षण सोडले आहे, असे मुलींच्या वडिलांनी सांगितले.
पोलिसांनी या व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून पुढचा तपास सुरू केला आहे. आरोपीची चौकशी केली जाईल आणि आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
वहिनी-वहिनी बोलायचा शेजारी अन् एक दिवस त्यानेच…
वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी घडली धक्कादायक घटना…
धक्कादायक! घरातले कामावर जाताच दिराने केला गरोदर वहिनीवर हल्ला…
वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच…
पोलिसाने पत्नीला केला मेसेज; ‘वहिनी तुम्ही खूप हॉट…’ अन् रंगेहात सापडला…
दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री…

