पोलिसकाका Video News: २३ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंधातून दोन चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं
पुणे : अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ पात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना महिलेच्या दोन लहान मुलांनी आरडा ओरड केल्यामुळे त्यांना पाण्यात जिवंत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी आरोपीला आंबी एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वाशिम जिल्ह्यात चार बहिणींनी भावाच्या मैत्रिणीला दगडाने ठेचून मारलं
वाशिम : वाशिमच्या कारंजा शहरामध्ये चार बहिणींनी भावाच्या मैत्रिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या चार बहिणींच्या भावाचे महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, यानंतर चारही बहिणींनी मिळून महिलेला दगड विटांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित असलेल्या लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनेही गळफास लावून जीवन संपवले आहे.

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : पुणे शहरात रात्र गस्त पथकातील पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वसरंक्षणार्थ पोलिस अधिकाऱ्याने एक राउंड फायर केला. कात्रजच्या वंडरसिटी परिसरात ही घटना घडली आहे.

माजी सैनिकाने आईसह भाऊ, वहिनी आणि 3 पुतण्यांची केली हत्या
अंबाला (हरियाणा): अंबाला येथील नारायणगड येथे दोन एकर जागेसाठी निवृत्त सैनिकाने आपला भाऊ, वहिनी, सहा महिन्यांचा पुतण्या, पाच वर्षांची पुतणी आणि आई यांची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत पुन्हा हिट अँड रन! रिक्षाने पादचाऱ्यांना उडवले; एकाचा मृत्यू
मुंबईः मुंबईतील वांद्रे परिसरात हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना धडक दिली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना; पादचारी ठार
नाशिक: नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. नाशिक पुणे मार्गावरील पळसे येथील विसावा हॉटेल परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत ५८ वर्षीय परप्रांतीय पादचारी ठार झाला. या अपघातानंतर कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पाटीलाने ग्रामपंचायतीमध्ये घेतला गळफास
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पेवा गावच पोलीस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी ग्राम पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता. त्यात हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या नावाचा उल्लेख केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पालघरमध्ये भाजीपाल्याच्या गाडीतून गांजाची तस्करी
पालघरमध्ये भाजीपाल्याच्या गाडीतून गांजाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना जव्हार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कारवाईत गांजा आणि महिंद्रा पिकअप गाडीसह सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोपरगाव मध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खून
अहमदनगर : कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् आत्महत्या
अहमदाबाद (गुजरात) : एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीने घराच्या दारातच विष प्राशन केले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे एका गुंडासोबत प्रेमसंबध होते. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासोबत पळून गेली होती.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!