
नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवरीने माझा नवरा नामर्द असून, माझी फसवणूक झाली आहे, अशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. नवरा नामर्द असतानाही लपवून माझ्याशी लग्न लावण्यात आले आहे, असा आरोपही तिने केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर चार डॉक्टर्स आणि एका लॅब टेक्विशियनचे पॅनेल नेमून नवरदेवाची वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे.
तिंदवारी येथील एका युवतीचा सहा महिन्यांपूर्वी हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात लग्न झाले होते. पण, गेल्या तीन महिन्यांपासून ती नवविवाहित महिला तिच्या माहेरीच राहत होती. पती आणि सासरचे लोकं हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार तिने तिंदवारी पोलिस ठाण्यात दिली होती. आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकलो नाही, तेव्हा त्यांनी मला बेदम मारहाण केली. तसेच माझा नवरा नामर्द आहे, हे सत्यही लग्नाच्या वेळी माझ्यापासून लपवून ठेवण्यात आले, असे त्या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पीडितेचा पती आणि तिच्या सासरच्या इतर लोकांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी पतीची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. अहवाल हाती आल्यानंतर नवरा खरंच नामर्द आहे का, हे समजू शकेल. तपासाच्या आधारे आरोपींवर कारवाई केली जाईल, असे तिंदवारी पोलिस ठाण्याचे प्रभारी कौशल सिंह यांनी सांगितले.
हनिमूनची तयार करत असतानाच नवरीची रवानगी कारागृहात…
हनिमूनच्या रात्रीच पत्नीने केली नवरदेवाला बेदम मारहाण…
हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…
हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…
वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

