
कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू…
हिंगोली : हिंगोलीच्या डिग्रस वाणी ते सिरसम रस्त्यावर दुचाकीला झालेल्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दुचाकीवरून तिघेजण सिरसम येथे रुग्णालयात जात असताना ही दुर्घटना घडली आहे. कुंडलिक जाधव, आकाश जाधव व कलावती जाधव अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुचाकीवरुन जात असताना रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी नाल्यात गेली. या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अपघात झाल्याची माहिती ग्रामस्थांना समजली आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून, पुढील तपास करत आहेत.
दुचाकी अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू; दुचाकीचे दोन तुकडे…
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…
अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…
साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…
हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

