पुणे! प्रेयसीचा वाढदिवस लॉजवर साजरा केला अन् केली निर्घृण हत्या…

पुणे: एक युवक प्रेयसीला घेऊन वाकड परिसरातील एका लॉजवर गेला होता. लॉजवर प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला आणि त्याने चाकू आणि ब्लेडने प्रेयसीवर वार केले. या घटनेत युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: कोंढवा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपी प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. दिलावर सिंग असे अटक केलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. मेरी तेलगू (वय २६) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे.

आरोपी दिलावर सिंग आणि मेरी तेलगू दोघंही मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. १० ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस होता. त्यामुळे दोघंही वाकड परिसरात भेटले. दिलावरने वाकड येथील एका लॉजवर प्रेयसी मेरी तेलगूचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या काही तासात ११ ऑक्टोबर रोजी प्रियकर दिलावर सिंग याने मेरीवर चाकू आणि ब्लेडने वार करून तिची हत्या केली.

मेरी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मेरी ही डी-मार्टमध्ये काम करत होती. दिलावर हा हॉटेल व्यावसायिक आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवरून दोघांची ओळख झाली होती. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. हत्येनंतर आरोपी दिलावर सिंग याने थेट कोंढवा पोलिस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले. वाकड पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…

पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…

धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!