खोक्या सापडला! प्रयागराजमधून सतीश भोसले याला पोलिसांनी केली अटक…

बीड: बीड पोलिसांनी सतीश भोसले अर्थात खोक्या याला प्रयागराज येथून अटक केली आहे. खोक्याचा मारहाण करणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता. खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे खोक्याला राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू होती. खोक्याविरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल होते. त्यानंतर मंगळवारी रात्री त्याच्या विरोधात अमली पदार्थाच्या तस्करीबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी खोक्याला अटक केली असून त्याला महाराष्ट्रात आणले जाईल अशी माहिती आहे. खोक्याने बॅटनं एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ करुन सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्यासाठी व्हायरल केला होता. आता पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केली आहे.

खोक्या सध्या प्रयागराज पोलिसांच्या ताब्यात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आज यश आले आहे. गेल्या आठवड्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा सतीश भोसले याला अटक करण्यात आली आहे. त्याला उद्यापर्यंत बीडमध्ये आणलं जाऊ शकते. खोक्या ऊर्फ सतीश भोसलेवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ढाकणे पितापुत्राला मारहाण केली होती, त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गांजा घरी सापडल्यानंतर त्याचा देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खोक्या गेल्या दोन आठवड्यांपासून बीडमध्ये फिरत होता पण पोलिसांना तो सापडला नव्हता. सध्या त्याला अटक करण्यात आली आहे.

आमदार सुरेश धस यांनी खोक्या ऊर्फ सतीश भोसले हा केवळ रिल्स करत असल्याचे म्हटले होते. खोक्यानं ढाकणे पिता पुत्राला मारहाण करण्याचं प्रकरण समोर आले होते. खोक्या फरार असल्याने सुरेश धस यांची देखील अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले होते.

धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…

खोक्या भाईने पैसे उधळल्यानंतर काय दिलं उत्तर पाहाच…

बीडमध्ये अमानुष मारहाण! ‘खोक्या’ आला समोर अन् सांगितलं…

संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…

वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…

बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई…

बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!