धक्कादायक! युवक झोपेत असताना लागला चालू अन्…

मुंबई : मुंबईत झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना भायखळा परिसरात घडली आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला (वय १९) असे या मृत युवकाचे नाव आहे.

मुस्तफा इब्राहिम चुनावाला याला झोपेत चालण्याची सवय होती. 30 जूनच्या मध्यरात्री मुस्तफा झोपेत चालत असताना सहाव्या मजल्यावरून खाली पडला. मुस्तफा तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. त्यानंतर त्याला तात्काळ सेफी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, मुस्तफा इब्राहिम चुनावाला याचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…

Video: …तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते

हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी धावताना अक्षय जमीनीवर कोसळला अन्…

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!