पुणे शहरात प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार आरोपीला लष्कर पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रात्रीचे वेळी प्रवाशांची लुटमार करणाऱ्या तडीपार आरोपीला त्याच्या दोन साथीदारांसह लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लष्कर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २८८ / २०२४, भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) मधील फिर्यादी फिरोज रशिद शेख (रा. मार्केट यार्ड, पुणे मुळ रा. लातूर) हे १५/१२/२०२४ रोजी पहाटे ०३/०० वा. चे सुमा. खाजगी ट्रॅव्हल बसने लातुर येथून पुण्यामध्ये आल्यानंतर ते म. गांधी बस स्टॉप जवळ उतरून पायी चालत बस स्टॉपकडे जात होते. पोलिस रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार छोट्या उर्फ अभिषेक शिवाजी आल्टे व त्याचे साथीदार १) अमर विशाल खरात, २) जयेश गणेश भिसे, यांनी मोटार सायकलवर ट्रिपल सीट येवून फिर्यादीस रस्त्यामध्ये अडविले व त्यांना हाताने मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला आहे. चोरट्यांनी गुन्हा केल्यानंतर फिर्यादीने मदतीकरीता आरडा ओरडा केल्यामुळे आरोपी त्यांची दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. दुचाकीचे मालकाचा शोध घेवून त्यामाध्यमातून तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अथक प्रयत्न करून शोध घेवून आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. प्रस्तुत प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, आरोपींकडे खालीलप्रमाणे दाखल दोन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दोन मोटार सायकली व एक मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत

लष्कर पोलिस स्टेशन गुन्हे अभिलेखावर पडताळणी करून पाहिले असता लष्कर पोलिस ठाणे गु. र. क्र. १२८/२०२४, भा. द. वि. कलम ३७९, तसेच इतर पोलिस स्टेशन गुन्हे अभिलेखावर पडताळणी केली असता, मुंढवा पोलिस ठाणे गु. र. क्र. ४२७/२०२४, भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३०३(२) असे इतर दोन गुन्हे केले असल्याचे तपासात उघडकिस आले आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी वाहना अनुक्रमे स्प्लेंडर मो. सा. क्र. एम एच १२ जे टी ७९०२, व एप्रेला मोपेड क्र. एम एच १२ व्ही पी ०३२७ अशी दोन वाहने एकूण किंमत रुपये ८०,०००/- आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहेत. सदर गुन्ह्याचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक राहुल घाडगे करीत आहेत.

अ. क्र आरोपीचे नाव पत्ता
१) छोट्या उर्फ अभिषेक शिवाजी आल्टे, वय २३ वर्ष, रा. बी इमारत /७०४, मंजुळाबाई चाळ, बाबाजान चौक, कॅम्प, पुणे,
दाखल गुन्हे
१) वानवडी पो. स्टे. गु. र. क्र. ८२४/२०२४, भा. द.
वि. क. ३२६, ५०४, ३४ प्रमाणे
२) वानवडी पोलिस स्टेशन गु. र. क्र. ३८७/२०२४,
भा. द. वि. कलम ३२६, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे
(३) लष्कर पोलिस स्टेशन, गु. र. क्र. २८८/२०२४, भा.
न्या. सं. २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५)

अ. क्र आरोपीचे नाव पत्ता
२ अमर विशाल खरात, वय १९ वर्ष, रा. साईबाबा मंदिरासमोर, सोलापुर बाजार, कॅम्प, पुणे
दाखल गुन्हे
१) लष्कर पोलिस स्टेशन, गु. र. क्र. २८८/२०२४, भा.
न्या. सं. २०२३ चे कलम ३०९(४), ३(५)

अ. क्र आरोपीचे नाव पत्ता
३ जयेश गणेश भिसे, वय १९ वर्ष, रा. लक्ष्मीमाता मंदिरामागे, कासेवाडी, भवानीपेठ,पुणे,
दाखल गुन्हे
१) लष्कर पोलिस स्टेशन, गु. र. क्र. २८८/२०२४, भा.
न्या. सं. २०२३ चे कलम ३०९(४), ३(५)

संबंधित कामगीरी ही पोलिस आयुक्त, पुणे शहर, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे प्रविणकुमार पाटील, पोलिस उप आयुक्त स्मार्तना पाटील, परि. २, सहा. पोलिस आयुक्त दिपक निकम, लष्कर विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरिषकुमार दिघावकर, पोलिस निरिक्षक (गुन्हे) प्रदिप पवार, पोलिस उप निरिक्षक राहुल घाडगे, महिला पोलिस उप निरिक्षक ज्योती कुटे यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील पोलिस अंमलदार पो. हवा. महेश कदम, पो. हवा. सोमनाथ बनसोडे, पो. हवा. संदिप उकिर्डे, पो. हवा. रमेश चौधर, पो. ना. सचिन मांजरे, पो. शि. लोकेश कदम, पो. शि. सागर हराळ, महिला पो. शि. अल्का ब्राम्हणे, बीट अंमलदार पो. हवा श्रीनिवास केंजळे, पो. हवा. भगवान पाटोळे, पो. हवा. रविंद्र कदम यांनी केली आहे.

पुणे शहरात चोरी करणाऱ्या सराईत टोळीप्रमुखासह साथीदारांना लष्कर पोलिसांनी केली अटक…

पुणे-सोलापूर रस्त्यावर लूटमार करायचे अन् पैसे कला केंद्रात उडवायचे; सहा जणांना अटक…

हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…

पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…

पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास केले जेरबंद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!