
मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…
लखनौ (उत्तर प्रदेश) : मेहुणी आणि दाजीचे प्रेमसंबंध होते. सासूला या प्रेमसंबंधाची माहिती समजली होती. सून आणि तिच्या दाजीने हत्या करण्याचे ठरवले. जनावराच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पण, पोलिसांनी गुन्हा उघड केला आहे.
जनावराच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणातले आरोपी मृत महिलेची सून आणि सुनेच्या बहिणीचा नवरा असल्याचे तपासात समोर आलं आहे. या दोघांचेही अनैतिक संबंध होते आणि याबाबत सासूला समजले होते, त्यामुळे आरोपींनी त्यांच्या मित्रांच्या साथीने सासूचा काटा काढण्याचा प्लान केला.
उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये राजरानी नावाच्या महिलेची हत्या तिची सून आणि सुनेच्या दाजीने मित्रांच्या साथीने केली आहे. पिहानी पोलिसांनी याबाबतचा खुलासा करत दोन आरोपींना अटक केली आहे. राजरानी यांच्या सुनेचे दाजीसोबत प्रेमसंबंध संबंध होते, त्यामुळे तो रोज घरी यायचा. राजरानीला त्याचं घरी येणं खटकत होतं, याबद्दल तिने वारंवार विरोधही केला, पण यात तिचा मृत्यू झाला.
महिलेच्या हत्येप्रकरमी रामराज आणि अरविंद या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामराजने तपासादरम्यान सांगितले की, मेहुणीसोबत अनैतिक संबंध होते, त्यामुळे तो रोजच घरी यायचा, याला राजरानीने विरोध केला. त्यामुळे रामराजने आपला मित्र अरविंदच्या मदतीने शेतात जनावर चारायला गेलेल्या राजरानीवर हल्ला केला. पहिले त्याने राजरानीच्या चेहऱ्यावर दांड्याने वार केला, यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर रामराजने जनावराच्या हल्ल्यात राजरानीचा मृत्यू झाल्याचा आरडाओरडा गावात केला.
पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…
पोलिसांची गुप्त खोलीत धाड; ८ युवती अन् २ मुलांना पकडले रंगेहाथ…
Video: जवानाने पोलिस दलात असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं…
पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्…
Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…

