
प्रेमविवाह! मुख्याधापिकेने केला शिक्षक नवऱ्याचा खून; विद्यार्थ्यांना घेतले सोबत अन्…
यवतमाळ : यवतमाळमधील चौसाळा जंगलात 15 मे रोजी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्या मृतदेहामागचे गुढ उकलण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. मुख्याध्यापक पत्नीनेच विष देऊन पतीचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शंतनू अरविंद देशमुख (वय 32, रा. सुयोगनगर) यांचा तो मृतदेह असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. शंतनू देशमुख हे 13 मेच्या सायंकाळपासून बेपत्ता होते. ते सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते, तर त्याच ठिकाणी पत्नी निधी (वय 23) ही मुख्याध्यापिका होती. प्रेमविवाह असल्याने ते आई-वडिलांपासून विभक्त राहत होते. शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला. तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले. दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये कुजबुज सुरू झाली. पोलिसांनी मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एकाच्या मोबाइलमध्ये शंतनूचा 13 मे रोजीचा फोटो दिसला. त्याच्या अंगातील शर्ट आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच आढळून आले होते. पोलिसांनी तपास सुरू केल्यानतर आरोपी पत्नी निधीने प्रथम पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, तिच्या घरात आढळलेली अंडरवेअर व मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीची असल्याने पोलिसांचा संशय आधिक बळावला. तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करताच निधीने हत्येचा संपूर्ण घटनाक्रमच कबुलीतून सांगितला आहे. मृतदेह जाळण्यास मदत केलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सनराईज स्कुल येथे कार्यरत शिक्षक शंतनु देशमुख हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यावरुन त्याचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षिरसागर, राजेश ऊईके तसेच सुजीत भांदक्कर यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. यामध्ये शंतनु देशमुख 13 मे पासून त्यांचे संपर्कात नसल्याचे सांगितले. 18 मे रोजी घटनास्थळावरुन जप्त अर्धवट जळालेल्या शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन हे शंतनु देशमुख याचे असल्याचे मित्रांनी ओळखले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू…
बीड! परळीत मुंडे गँगकडून युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण, पाहा भयानक Video…
पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…
पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…
शिक्षिकेने ओढलं विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात अन् स्वतःच अडकली…

