महाराष्ट्र ATS चे प्रमुख सदानंद दाते यांची NIAच्या महासंचालकपदी नियुक्ती…

नवी दिल्ली : 1990 महाराष्ट्र केडरचे प्रसिद्ध IPS अधिकारी सदानंद वसंत दाते यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) DG पदावर नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने सदानंद दाते आणि इतर दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये नियुक्त्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.

सदानंद दाते यांना 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. दहशतवाद, नक्षलवाद, अतिरेकी, इंडियन पॉप्युलर फ्रंट यांसारख्या बंदी घातलेल्या संघटना आणि खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात देशासोबतच अमेरिका, ब्रिटन, कॅनडात या देशांतून तपास करणाऱ्या एनआयएची धुरा आता सदानंद दाते यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री मुंबई शहरावर 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळी ते काही अधिकाऱ्यांमध्ये होते, जे अतिरेक्यांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणी पहिल्यांदा पोहोचले आणि शेवटपर्यंत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी प्रयत्न करत होते. याचवेळी दाते यांचं धैर्य आणि कठीण परिस्थितीतला समजुतदारपणा दिसला. ज्यामुळे अबू इस्माईल आणि अजमल कसाब यांनी ओलिस ठेवलेल्या लोकांची सुटका करण्यात यश आलं. त्यानंतर दोन दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या कसाबला जिवंत पकडण्यात यश आलं. 26/11 च्या हल्ल्यात दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.

सदानंद दाते यांनी महाराष्ट्र एटीएसचे विद्यमान प्रमुख (एनआयएचे डीजी म्हणून नियुक्ती होईपर्यंत), त्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये डीआयजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये आयजी (ऑप) म्हणूनही काम केलं आहे. मुंबईजवळील मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरांचं पोलीस आयुक्तपदही त्यांनी भूषवले आहे. सदानंद दाते हे गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ पोलीस सेवेत कार्यरत आहेत. पोलीस सेवेतल्या विविध अनुभवांवर त्यांनी ‘वर्दीतील माणसांच्या नोंदी’ हे पुस्तक लिहिले आहे.

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…

राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…

महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…

पोलिस अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, फेटे बांधणे, पुष्पवृष्टीवर बंधने…

महाराष्ट्र गृह विभागाचा पोलिसांना मोठा दिलासा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!