
सोलापूर जिल्ह्यात दारूड्यांचा बिल देण्यावरून घातला जोरदार राडा…
सोलापूरः एका हॉटेलमध्ये बिल देण्याच्या वादातून दारूड्यांनी राडा घालताना मॅनेजरला बेदम मारहाण केली आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
बार्शी तालुक्यात मंगळवारी (ता. 23) रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. दारुड्यांनी बिलावरून वाद घालत हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत हॉटेल मॅनेजर महेश अंधारे जखमी झाले आहेत. मॅनेजरला मारहाण होत असताना इतर दारुडेही मध्ये पडले. त्यांनीही मॅनेजरला दारुच्या बाटल्या फेकून मारत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
दारुड्यांनी बिलाच्या वादातून दारूच्या बाटल्या मॅनेजरच्या डोक्यावर फोडल्या. शिवाय, २० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सागर ओहोळ, तथागत मस्के, निखिल ननवरे, समर्थ वस्ताद असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसकाका Video News: २४ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…
धक्कादायक Video! मुरबाडमध्ये वायरमनचा मृत्यू CCTV मध्ये झाला कैद…
ह्रदयद्रावक! महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू…
वाशिम हादरलं! चार बहिणींनी भावाच्या मैत्रिणीला दगडाने ठेचून मारलं…