पुणे! वाघोली परसिरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मित्राकडूनच खून…

पुणे : वाघोली परिसरात शनिवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार बादल शेख याचा त्याच्याच मित्राने खून केला आहे. या घटेनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. वाघोली पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. वाघोली परिसरातील प्यासा हॉटेलसमोर अचानक मित्राने केलेल्या हल्ल्यात बादल शेख गंभीर जखमी झाला आणि त्याच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील […]

अधिक वाचा...

फरासखाना पोलिस ठाणे हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष…

पुणेः पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाणे हद्दीत सणासुदीच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिस दुर्लक्ष करत असल्याची तक्रार महिलेने केली आहे. पुणे शहरातील रविवार पेठ परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलांकडून पर्स, मोबाईल फोन व दागिन्यांची चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गोळीबार करत टाकला दरोडा…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड) : आंबेगाव तालुक्यात पेट्रोल पंपावर रात्री साडेनऊच्या सुमारास दरोडा पडला असून, आरोपी रोख रक्कम एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. तांबडे मळा (ता. आंबेगाव) येथील पुणे नाशिक महामार्गाच्या लगत ऋषी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये शुक्रवारी (ता. ३) रात्री […]

अधिक वाचा...

जळगाव ! दसऱ्याच्या दिवशीच युवकाची भोसकून हत्या…

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील कासमवाडी परिसरात दोन कुटुंबातील वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी वाद झाल्यानंतर युवकावर धारदार चाकुने वार करण्यात आले. वार वर्मी लागल्याने युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील (वय २७) असे हत्या झालेल्या […]

अधिक वाचा...

पुणे! युवतीला रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण…

पुणे: पुणे शहरात रात्रीच्या सुमारास एक युवक एका युवतीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका किरकोळ वादातून एका युवकाने युवतीच्या कानशिलात लावत लाथा बुक्क्यांनी मारल्याचे हा व्हिडीओमध्ये दिसत आहे. परिसरातील नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर मार्गावर मंगळवारी रात्री […]

अधिक वाचा...

उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; आरोपीला अटक…

सोलापूर : उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. राणा सूर्यवंशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीमध्ये सुरू केलेल्या मोठ्या सामाजिक कामामुळे ते लोकांच्या मनात ठसले होते. त्यातूनच हा प्राणघातक हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. राणा सूर्यवंशी नेहमीप्रमाणे कामानिमित्त सोलापूर […]

अधिक वाचा...

लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

सोलापूर: लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुधवारी मध्यरात्री कारने प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. याघटनेत अनमोल केवटे (वय ३७, रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले ही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले, चाकू गळ्यात […]

अधिक वाचा...

पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…

पुणे: पुणे शहरातील कोथरूडमध्ये गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री एका व्यक्तीवर गोळीबार झाला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात प्रकाश धुमाळ (वय ३६) हे गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार झाला तेव्हा धुमाळ आपला जीव वाचवण्यासाठी धवात होते, त्यावेळी त्यांच्या अंगावरून पडणाऱ्या रक्ताने माखलेले पायाचे […]

अधिक वाचा...

सांगलीत ‘स्पेशल 26’ स्टाईल दरोडा, डॉक्टरला संशय आला अन्…

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे ‘स्पेशल 26’ या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे दोरड्याचा प्रकार घडला आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरच्या घरात बनावट आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली आहे. कवठेमहांकाळ शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी सांगत चार व्यक्तींनी त्यांच्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नवविवाहित मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला गळफास…

जळगाव: जळगाव शहरातील सुंदरमोती नगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेनं लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात आणि वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीसह सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळातून तरुणीने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरी गौरव ठोसर (वय २३) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!