
कोल्हापुरात व्यावसायिकाचे अपहरण अन् करंट देऊन केली अमानुष हत्या…
कोल्हापूर : एका व्यावसायिकाची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दानोळी गावात घडली आहे. आरोपींनी २५ लाखांची खंडणी उकळण्यासाठी व्यावसायिकाचं अपहरण केले होते. मात्र, त्यानंतर पैसे न घेताच हल्लेखोरांनी करंट देऊन व्यावसायिकाला संपवले आहे. यानंतर त्यांनी एका शेतात व्यावसायिकाचा मृतदेह टाकून पळ काढला. भरतेश राजगोंडा टोपगोंडा असं हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मंथन पवार आणि राजदीप ताडे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. आरोपींनी बॅटरीने करंट देऊन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एका व्यावसायिकाची अशाप्रकारे अमानुष हत्या केल्याने गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
भरतेश राजगोंडा टोपगोंडा यांचा मृतदेह शेरी मळा परिसरातील शेतात आढळून आला आहे. २५ लाखांच्या खंडणीसाठी अज्ञातांनी भरतेश यांचे अपहरण केले होते. अपहरणाच्या काही वेळानंतर आरोपींनी भरतेश यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या चुलत भावाला कॉल केला. या कॉलमध्ये मोठी रक्कम घेऊन ठरावीक ठिकाणी येण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार भरतेश यांचा भाऊ महावीर आणि त्याचे दोन मित्र सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र, अपहरणकर्ते सतत लोकेशन बदलत होते. काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णपणे तुटला. दरम्यान, काही तासांनंतर भरतेश यांचा खून झाल्याची माहिती समोर आली. आरोपींनी बॅटरीचा वापर करून शॉक देऊन भरतेश यांना संपवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सध्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; ‘सदैव एकनिष्ठ’ स्टेटस ठेवणारा गजाआड…
पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…
पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…
नाशिक! नवविवाहित पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्याचे अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न…
सैराट! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बेदम मारहाण अन् अपहरण…

